Hashtagintro

एक असं शापित गाव… पोरी मोठ्या होताच अचानक होतात मुलं; थेट लिंग बदलच… काय आहे भानगड?

एक असं शापित गाव… पोरी मोठ्या होताच अचानक होतात मुलं; थेट लिंग बदलच… काय आहे भानगड?

कल्पना करा तुम्ही एक मुलगी आहात आणि काही विशिष्ट वयानंतर तुमचे जेंडर आपोआप बदलले. तुम्ही आता मुलगा बनले आहेत. हे एखाद्या कथेतील कहाणी प्रमाणे वाटत असले तरी खरे आहे. डॉमिनिकन रिपब्लिक देशातील ला सेलिनास नावाच्या गावाची ही कहाणी आहे. ही कहाणी शास्त्रज्ञांसाठीही रहस्य बनली आहे. इथल्या मुलींचे एका विशिष्ट वयानंतर जेंडर बदलते. आता या मागचे कारण काय? वाचा सविस्तर…

बीबीसीने या गावाबाबत रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्टनुसार, इथल्या मुली मुलांमध्ये रूपांतरित होण्याबाबत शास्त्रज्ञ दशकांपासून संशोधन करत आहेत. बीबीसीने आपल्या ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ द ग्वेवेदोस’ या कथेत म्हटले आहे की मुली मुलांमध्ये रूपांतरित होण्याच्या कारणामुळेच इथले लोक गावाला शापित गाव मानतात. या रहस्याचा आजतागायत शास्त्रज्ञांनाही उलगडा झालेला नाही.

१२ वर्षांच्या वयापर्यंत जेंडर बदल सुरू होतो

रिपोर्टनुसार, या गावात १२ वर्षांचे वय येता-येता सर्व मुली मुलांमध्ये रूपांतरित होतात. अशा प्रकारच्या मुलांना ‘ग्वेदोचे’ म्हटले जाते. स्थानिक भाषेत या शब्दाचा अर्थ किन्नर असा होतो. अशा घटनांमुळेच इथे राहणारे लोक घरात मुलगी जन्माला येण्याची भीती बाळगतात. परिस्थिती इतकी आहे की या गावात मुलगी जन्माला आली की शोक पसरतो. या विचित्र घटनांमुळे गावात मुलींची संख्याही खूप कमी होत चालली आहे.

बीबीसीशी बोलताना या गावातील जॉनी नावाच्या मुलीने सांगितले आहे की, “मला मुलींच्या वेषात कपडे घालायला आवडत नव्हते आणि जेव्हा मला मुलींची खेळणी मिळाली, तेव्हा मला चांगले वाटत नव्हते. पण जेव्हा मी मुलांचा गट पाहत असे, तेव्हा मी त्यांच्यासोबत चेंडू खेळण्यासाठी थांबत असे.”

डॉक्टरांचे म्हणणे काय?

रिपोर्टनुसार, या गावाबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की या सगळ्यामागे एक प्रकारचe अनुवांशिक आजार आहे. ज्याला ‘स्यूडोहर्मॅफ्रोडाइट’ म्हटले जाते. या आजारात मुलीच्या रूपात जन्माला आलेल्या मुलीमध्ये हळूहळू मुलांचे अवयव तयार होऊ लागतात. त्यासोबतच वाढत्या वयासोबत आवाज बदलू लागतो. आवाजात आपोआप खालीरपणा येऊ लागतो.

संशोधनाचा विषय बनलेले हे गाव

अनेक संशोधकांनी या आजारावर उपचार शोधण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही यश मिळालेले नाही. रिपोर्टनुसार, हे गाव समुद्रकिनारी वसलेले आहे आणि गावाची लोकसंख्या सुमारे ६ हजार आहे. विचित्र रहस्यामुळे हे गाव जगभरातील संशोधकांसाठी संशोधनाचा विषय बनले आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language