Hashtagintro

Sindhudurg Rain : सावंतवाडीत विजांच्या कडकडाटासह पाऊस

सावंतवाडी : सावंतवाडी शहर व ग्रामीण भागात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. दुपारी अचानक वातावरण बदलून काळे ढग दाटून आले आणि तब्बल तासभर धुवाँधार पाऊस कोसळला.

अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारातील नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनचालकांची मोठी धांदल उडाली. गेल्या काही दिवसांपासूनच्या दुष्काळसदृश परिस्थिती व पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस भूगर्भाची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.

दुसरीकडे ऐन कापणीच्या व तयार होण्याच्या स्थितीत असलेल्या भातपिकांवर या पावसाचे संकट ओढवले आहे. पिके आडवी होऊन कुजण्याची व हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात मोठी चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language