साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ही बातमी ऐकून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत सोन्याच्या दरात 30 हजारापर्यंत तर चांदीच्या दरात 68 हजार रुपये वाढ झाली आहे. पण आज दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात आज 20 ऑक्टोबर रोजी सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला ठरु शकतो.
आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 500 रूपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरात 1 हजारांची घसरण झाली आहे. दसऱ्याच्या मुबूर्तावर ही घसरण झाल्यामुळे अनेकांचा कल सोने आणि चांदी खरेदीकडे आहे.
20 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव 2 लाख 19 हजार 390 रुपये आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारातली साखळी विस्कळीत झाल्याने त्याचा देखील परिणाम सराफ बाजारावर झाल्याचं सराफ व्यावसायिक यांची प्रतिक्रिया. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi National





