Hashtagintro

Ranveer Singh : कुर्रर्रर्र! दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रणवीर आणि दीपिकानं जाहीर केलं दुसऱ्या लेकीचं नाव, दाखवली चिमुकलीची झलक

Ranveer Singh : कुर्रर्रर्र! दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रणवीर आणि दीपिकानं जाहीर केलं दुसऱ्या लेकीचं नाव, दाखवली चिमुकलीची झलक

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका खास कौटुंबिक पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आज दसऱ्याच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिकानं त्यांच्या मुलीचं बारसं केलं असून सोशल मीडियावर पोस्ट करत तिची झलकही दाखवली आहे.

दीपिका पादुकोणची पोस्ट

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांच्याही चाहत्यांची संख्या मोठी असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दीपिकानं रणवीर सिंगसोबत खास फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये दुआ आणि दुसरी लेकही दिसत आहे. आज दसऱ्याच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिकानं दुसऱ्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. ‘देवी पादुकोण सिंह’ असं रणवीर आणि दीपिकाच्या दुसऱ्या लेकीचं नाव आहे. फोटोमध्ये दुआ, देवीला जवळ घेताना दिसत आहे.या फोटोवर नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. रणवीर आणि दीपिकाही खूप आनंद दिसत आहेत.

 

दरम्यान, दीपिका आणि रणवीरनं एप्रिल २०२६ मध्ये सोशल मीडियाद्वारे दुसऱ्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांना दिली. तेव्हापासून चाहते त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सोनू सूद, श्रेया घोषाल, क्रिती सॅनॉन, सोनम कपूर आणि अनिल कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी दीपिका आणि रणवीरचे अभिनंदन केलं. दुसऱ्या बाळाच्या जन्मापूर्वी, दीपिका आणि रणवीरने सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. त्यांनी तिथं प्रार्थना करून आशीर्वाद घेतले. ८ सप्टेंबर रोजी दीपिकाने एका मुलीला जन्म दिला होता.

दीपिका आणि रणवीरनं २०१८ मध्ये लग्न केलं. सप्टेंबर २०२४ मध्ये, ते त्यांच्या पहिल्या मुलीचे, दुआचे, पालक बनले. आता कुटुंबात आणखी एका लहान मुलीच्या आगमनाने त्यांचा आनंद अधिकच वाढला आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language