Hashtagintro

Flipkart आता फूड डिलिव्हरी करणार, काय आहे ‘Eat-in by Minutes’ प्लान?

Flipkart आता फूड डिलिव्हरी करणार, काय आहे ‘Eat-in by Minutes’ प्लान?

फुड डिलिव्हरी ऐप्सचे जेव्हा नाव घेतले जाते तेव्हा तोंडावर पहिले नाव झोमॅटो आणि स्विगी यांचे येते. ही दोन्ही ऐप्स ग्राहकांत प्रसिद्ध आहेत. परंतू आता या दोन कंपन्याना स्पर्धक येत आहे. ही कंपनी ऑनलाईन वस्तू विकणारीच आहे. ती कंपनी दुसरी तिसरी कोणी नसून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आहे. फ्लिपकार्ट कंपनी आता फूड डिलिव्हरी व्यवसायात उतरत आहे. कंपनी तिची नवीन सर्व्हीस ‘ईट-इन बाय मिनट’ द्वारे झोमॅटो आणि स्विगीला टक्कर देणार आहे.

या शहरातून होणार सुरुवात

फ्लिपकार्ट आता फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरत आहे. या सेवेची सुरुवात आता बंगळुरु शहरातून होणार आहे. बातमीनुसार कंपनी ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस या योजनेला सर्वसामान्य ग्राहकांसाठी सुरु करणार आहे. या सेवेसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या ऐप्सवर ऑर्डर नोंदवावी लागणारआहे. कंपनीला आशा आहे की कंपनीचे सध्याचे ग्राहक आणि डिलिव्हरी नेटवर्क या योजनेसाठी मदतीला येतील.

सेवा अशी काम करेल?

फ्लिपकार्ट सध्या बंगलुरुतील त्यांच्या मुख्यालयातून या सेवेची ट्रायल सुरु करणार आहे. सध्या याचा वापर कंपनीचे कर्मचारी करत आहे. ट्रायलच्या दरम्यान यात ८ हजार कर्मचारी सामील होणार आहेत. तसेच सध्याच्या फ्लिपकार्ट ऐप्समध्ये फूड डीलिव्हरीसाठी वेगळे सेक्शन दिले जाणार आहे. या द्वारे ऑर्डर करता येणार आहे. तसेच कंपनी आपल्या लॉजिस्टीक्स नेटवर्कच्या मदतीने देखील डिलिव्हरीची व्यवस्था करण्यावर काम करत आहे.

या सेवेत असे रेस्टॉरंट देखील उपलब्ध होतील जे सरकारच्या समर्थनवाल्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) शी जोडलेले आहेत. याशिवाय फ्लिपकार्ट सोबत जोडणारे रेस्टॉरंट देखील सामील असतील. बातमीनुसार कंपनीची योजना २०२६ च्या अखेरपर्यंत या योजनेला सहा शहरात पोहचवण्याची आहे.

फ्लिपकार्ट किती कमिशन आकारणार?

फ्लिपकार्टच्या नवीन सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कमी कमिशन मॉडेल असू शकते. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (NRAI) अध्यक्ष सागर दरयानी यांच्या मते, फ्लिपकार्टने रेस्टॉरंटसाठी सुमारे १०% बेस कमिशन प्रस्तावित केले आहे. या तुलनेत, झोमॅटो आणि स्विगी साधारणपणे २०-२५% कमिशन आकारतात. मात्र, हे फ्लिपकार्टने प्रस्तावित केलेले बेस कमिशन आहे. जाहिराती, सवलती आणि इतर शुल्क जोडल्यास रेस्टॉरंटचा एकूण खर्च वेगळा असू शकतो.

 

 

 

 

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language