Hashtagintro

म्हशीचं मांस… भरपूर रसगुल्ले, दारू आणि… या सेलिब्रिटी कपलचं डाएट पाहून उडालच

म्हशीचं मांस… भरपूर रसगुल्ले, दारू आणि… या सेलिब्रिटी कपलचं डाएट पाहून उडालच

आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी सेलिब्रिटींकडून नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जातात. अनेकजण हटके लाइफस्टाईल अंगीकारतात. तरुण आणि एनर्जेटिक दिसण्यासाठी हा खटाटोप असतो. अभिनेता अनिल कपूर आणि अक्षय कुमार हे पहाटे 4 वाजताच एक्सरसाईज करतात. तर बिग बी अमिताभ बच्चन हे रात्री कितीही उशीर झाला तरी एक्सरसाईज करतात. नियमित न चुकता एक्सरसाईज करण्यामुळेच हे कलाकार एकदम फिट असतात. केवल एक्सरजाईच नाही तर खाण्यावरही त्यांचं प्रचंड लक्ष असतं. काही सेलिब्रिटींनी नॉनव्हेज सोडलंय. तर काहींनी नॉनव्हेज खाऊन स्वत:ला मेंटन ठेवलं आहे. बॉलिवूडमधील एका कपलचा डाएट ऐकून तुम्ही उडालच.

एका बॉलिवूड सेलिब्रिटी कपलला नॉनव्हेज प्रचंड आवडतं. खुद्द एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्याचा खुलासा केला आहे. या अभिनेत्रीला म्हशीचं मांस खायला खूप आवडतं. तर तिचा नवरा रसगुल्ले दारूत टाकून खातो. काही वर्षापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने हा खुलासा केला होता. आता ही मुलाखत पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची हे प्रसिद्ध कपल दुसरं तिसरं कोणी नसून काजोल आणि अजय देवगन आहेत. दोघेही खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत. नेहमीच नवनव्या गोष्टी खायला त्यांना आवडतं. काही वर्षापूर्वी काजोलने एका मुलाखतीत तिच्या खाण्याच्या पदार्थांबद्दल सांगितलं होतं. तिला म्हशीच्या मांसाची बनवलेली डिश खूप आवडते.

सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिच्या खाण्यापिण्यावर ती बोलताना दिसते. मित्राच्या घरी पार्टी करायला ती गेली होती. त्यावेळी तिच्यावर बीफ खालल्याची टीका झाली होती. तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण तिने स्वत: खुलासा करताना अफवांचं खंडन केलं होतं. आपण बीफ खाल्लं नसून म्हशीचं मांस खाल्लं होतं, असं तिने म्हटलं होतं.

दारूत रसगुल्ले

काजोलने एका मुलाखतीत तिचा नवरा अजय देवगनच्या आवडींबाबतही भाष्य केलं होतं. अजय देवगन रसगुल्ले धुवून पिळून ते दारूत टाकायचा आणि नंतर ही दारू प्यायचा. काजोलने हे सांगितल्यानंतर तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. दरम्यान, सध्याच्या घडीला त्यांच्या खाण्याच्या याच सवयी आहेत की बदलल्या याबाबतची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाहीये.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language