Hashtagintro

सनी लिओनीने खरेदी केली दमदार SUV, Tharलाही देते टक्कर, भारतातील किंमत पाहून बसेल धक्का

सनी लिओनीने खरेदी केली दमदार SUV, Tharलाही देते टक्कर, भारतातील किंमत पाहून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका दमदार लग्झरी SUVची भर पडली आहे. सनी लिओनीने अमेरिकेतील टेक्सास येथे ऑफ-रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेली Jeep Wrangler Rubicon ही SUV खरेदी केली आहे. पांढऱ्या रंगाच्या या नव्या गाडीची डिलिव्हरी घेतानाचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, या गाडीला ‘ममाज बीस्ट’ असे नाव दिले आहे.

दमदार इंजिन आणि ऑफ-रोडिंग क्षमता

सनी लिओनीने अमेरिकेतील रस्त्यांवर तसेच खडतर मार्गांवर ऑफ-रोडिंग करण्यासाठी ही SUV निवडल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या गाडीमध्ये 2.0-लिटरचे चार-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन असून, ते 270 हॉर्सपॉवरची ताकद आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि फोर-व्हील-ड्राइव्ह (4WD) सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे चिखल, दगड आणि खडतर रस्त्यांवरही ही गाडी दमदार कामगिरी करू शकते.

केबिनमध्ये प्रीमियम फीचर्स

Jeep Wrangler Rubicon मध्ये 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, Apple CarPlay, Android Auto, 9-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, रिमोट स्टार्ट आणि हीटेड फ्रंट सीट्स यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात. अमेरिकेत या SUVचे टू-डोअर आणि फोर-डोअर असे पर्याय उपलब्ध आहेत. सनीने पांढऱ्या रंगातील फोर-डोअर मॉडेल निवडले आहे.

भारतात किती आहे किंमत?

भारतीय बाजारात Jeep Wrangler ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 72.30 लाख रुपयांपासून सुरू होते. ही SUV आपल्या दमदार बांधणीमुळे आणि ऑफ-रोडिंग क्षमतेमुळे ओळखली जाते. मात्र, सनी लिओनीने खरेदी केलेल्या अमेरिकन मॉडेलची किंमत आणि भारतीय मॉडेलची किंमत वेगळी असू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीकडे आहेत महागड्या गाड्या

सनी लिओनीच्या कार कलेक्शनमध्ये यापूर्वीच Maserati Quattroporte, BMW 7 Series, Audi A5 आणि MG Gloster यांसारख्या गाड्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. अशातच आता नव्या Jeep Wrangler Rubicon मुळे तिच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका दमदार आणि आकर्षक SUVची भर पडली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language