Hashtagintro

World’s Most Polluted Cities | जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत लाहोर अव्वल

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील लाहोर हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत शुक्रवारी अव्वल स्थानी पोहोचले आहे. शुक्रवारी येथील एअर क्वालिटी इंडेक्सने (AQI) तब्बल ३४४ चा स्तर गाठला. हवेतील या घातक प्रदूषणामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जगभरातील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या ‘आयक्यूएअर’ (IQAir) या स्विस संस्थेने आपल्या थेट मानांकनात लाहोरला पहिल्या क्रमांकावर ठेवले असून, येथील हवा अत्यंत घातक श्रेणीत नोंदवली गेली आहे.

संस्थेच्या आकडेवारीनुसार, लाहोरच्या हवेत सूक्ष्म धूलिकणांचे (PM 2.5) प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांपेक्षा तब्बल ५७ पटीने जास्त आढळले आहे. हवेतील ‘पीएम २.५’चे हे वाढलेले प्रमाण कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. हे सूक्ष्म कण इतके बारीक असतात की ते श्वासावाटे थेट रक्ताभिसरणात प्रवेश करू शकतात; ज्यामुळे पक्षाघात (स्ट्रोक), हृदयविकार, फुफ्फुसांचा कर्करोग आणि श्वसनाचे गंभीर आजार जडण्याचा धोका कैकपटींनी वाढतो. दुपारपर्यंत लाहोरच्या हवेच्या दर्जात किंचित सुधारणा झाली असली, तरी तो ३०० च्या वरच कायम होता. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारताची राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

शुक्रवारी सकाळी ८ वाजता दिल्लीचा एक्यूआय २४४ नोंदवला गेला, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो. मात्र, दुपारच्या सत्रात यात घट होऊन तो १८३ वर आला. सकाळच्या नोंदीनुसार सेनेगलचे डकार शहर १८४ एक्यूआयसह तिसऱ्या स्थानी होते; मात्र दुपारपर्यंत कोलकाता शहर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. दुपारनंतर कोलकात्याचा हवेचा स्तर १७३ नोंदवला गेला. मलेशियातील क्वालालंपूर १७३ निर्देशांकासह चौथ्या, तर सिंगापूर १७० गुणांसह पाचव्या स्थानावर राहिले. भारताची आर्थिक राजधानी मुंबई १६२ च्या एक्यूआयसह या यादीत सहाव्या स्थानी नोंदवली गेली, तर शेजारील देश बांगलादेशची राजधानी ढाका दहाव्या क्रमांकावर राहिली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language