Hashtagintro

Kalyana Utsava : श्री लक्ष्मी व्यंकटेश-पद्मावती कल्याणोत्सव विवाह सोहळा उत्साहात

Sri Lakshmi Venkatesha-Padmavati Kalyana Utsava celebrated with great enthusiasm

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भाविकांच्या ‘गोविंदा गोविंदा’च्या जयघोषात आणि वेदमंत्रांच्या निनादात येथील श्री विठ्ठल मंदिर, ज्योतीनगर येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री लक्ष्मी व्यंकटेश-पद्मावती यांचा १७ वा कल्याणोत्सव विवाह सोहळा भक्तिभावात पापडला.

नवरात्रीच्या पहिल्या माळेला साखरप सुरू झालेल्या या महोत्सवात नऊ दिवस हजारो भाविकांनी हळद, मेहंदी, अभिषेक अशा विविध सेवा केल्या. दसऱ्याच्या दिवशी यजमान श्रीकांत मणियार यांच्या निवासस्थानी मूर्तीचा अभिषेक, तर मोहिनी जहागीरदार यांच्या निवासस्थानी पूजनानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली.

माजी नगरसेविका सुमित्राताई हळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली १०१ सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले, तर मुख्य संयोजक माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तिरुपतीच्या धर्तीवर सजवलेल्या मंडपात वेदमूर्ती लक्ष्मीकांत जोशी (कांता गुरुजी) यांच्या पौरोहित्याखाली आणि विजयकुमार पल्लोड महाराज, सुनील अत्रे गुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीकांत मणियार, संजय सारडा व बालाप्रसाद झंवर या दाम्पत्यांच्या हस्ते विवाहविधी पार पडला. सोहळ्यानंतर दोन हजारांवर भाविकांनी लाडू व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language