Hashtagintro

India A vs NZ A Test: भारत 'अ' चं कमबॅक सुरू; पडिक्कल-सुदर्शन नाबाद, न्यूझीलंड अजूनही पुढे

लिंकन (न्यूझीलंड): न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने संकटात सापडल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न केला आहे. दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 106 धावा झाल्या होत्या. सध्या भारतीय संघ यजमान न्यूझीलंडपेक्षा 98 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताच्या पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. पहिल्या डावात भारत ‘अ’ संघ अवघ्या 113 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड ‘अ’ संघाने पहिल्या डावात 317 धावा करत मोठी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून कर्णधार राइस मारियूने पहिल्या दिवशी 76 धावा केल्या, तर दुसऱ्या दिवशी डीन फॉक्सक्रॉफ्टने 79 चेंडूंत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्टिस हीफीनेही 44 धावांचे योगदान दिले. भारताकडून अंशुल कंबोज आणि आकिब नबी यांनी प्रत्येकी तीन, आकाश दीपने दोन, तर मुकेश चौधरी व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
https://www.prahaar.in/2026/10/25/india-vs-new-zealand-t20-series-matt-henry-ruled-out-big-blow-for-kiwis/
प्रमुख फलंदाज अपयशी
न्यूझीलंडमधील कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कसोटी संघातील अनेक खेळाडूंना या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. मात्र, स्टार फलंदाजांना याचा लाभ उठवता आला नाही. पहिल्या डावात अपयशी ठरलेली यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी दुसऱ्या डावातही फ्लॉप ठरली. केएल राहुल पहिल्या डावात खाते उघडू शकला नाही, तर दुसऱ्या डावात त्याला केवळ 4 धावा करता आल्या. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्या.

पडिक्कल आणि सुदर्शनची मजबूत भागीदारी
अवघ्या 10 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांनी संघाचा डाव संभाळला. दोघांनी संयमी फलंदाजी करत दिवस संपपर्यंत कोणतीही पडझड होऊ दिली नाही.
देवदत्त पडिक्कल: 89 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 56 धावांवर नाबाद खेळत आहे.
साई सुदर्शन: 104 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 39 धावांवर नाबाद आहे.
तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांवर ही आघाडी मोडून काढण्याची आणि न्यूझीलंडसमोर सन्मानजनक लक्ष्य ठेवण्याची मोठी जबाबदारी असेल.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language