Hashtagintro

Kolhapur Board Exam| दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या परीक्षार्थींचे शुल्क माफ

कोल्हापूर : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. याचा कोल्हापूर विभागातील २९ तालुक्यांतील विद्यार्थांना फायदा होणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. ही सवलत शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित संस्थांमधील विद्यार्थ्यांना लागू आहे. पुनर्परीक्षार्थी आणि बहिःस्थ विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. तसेच, शिक्षण किंवा रोजगारासाठी शहरात राहणाऱ्या, मात्र मूळ गाव अथवा पालकांची शेतजमीन दुष्काळग्रस्त तालुक्यात असलेल्या विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफी मिळेल.

अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचे अर्जही विनाशुल्क भरले जाणार आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले असेल तर ते परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंडळाकडे ऑनलाईन शुल्क जमा केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना आधारसंलग्न बँक खात्यातून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) परतावा मिळेल. यासाठी मुख्याध्यापकांनी सात दिवसांत ‘ड्राऊट एंट्री’ सुविधेद्वारे आवश्यक माहिती नोंदविणे बंधनकारक आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी पालकांसाठी हा निर्णय म्हणजे ऐन परीक्षेच्या काळात मोठा मानसिक व आर्थिक आधार ठरणार आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language