Hashtagintro

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतने रचला नवा इतिहास! बॉक्स ऑफिसवर वयाच्या 75व्या वर्षीही जलवा

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतने रचला नवा इतिहास! बॉक्स ऑफिसवर वयाच्या 75व्या वर्षीही जलवा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची देशभरात प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. नुकताच त्यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित जेलर 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ने अनेक नवीन चित्रपटांच्या गर्दीतही भारतीय बॉॉक्स ऑफिसवर सातत्याने मजबूत कामगिरी केली असून दररोज चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी उत्कृष्ट कामगिरी केली आणि आता रविवारीही आणखी एका रेकॉर्ड केला आहे. चला जाणून घेऊया, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी किती कलेक्शन केले आहे? चला जाणून घेऊया…

रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ने आपली गती कायम ठेवली असून भारतीय बॉॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला आहे. ऐतिहासिक ओपनिंग आठवड्यानंतरही हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. दुसऱ्या शुक्रवारी मजबूत कमाई केल्यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी जोरदार उडी मारत धमाकेदार कमाई केली आणि दुसऱ्या रविवारी तर त्याने धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाच्या कलेक्शनबाबत बोलायचे झाले तर ‘जेलर २’ने पहिल्या आठवड्यात ३३४.३५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने ९व्या दिवशी १४.४० कोटी कमावले. मग १०व्या दिवशी ‘जेलर २’ने गती वाढवली आणि २४.१५ कोटींचे शानदार कलेक्शन केले. आता सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार ‘जेलर २’ने प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी २५.७० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच भारतात या चित्रपटाची ११ दिवसांची नेट कमाई आता ३९९.७० कोटी रुपये झाली आहे.

रचला नवा इतिहास

‘जेलर २’ने प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी भारतीय बॉॉक्स ऑफिसवर २५.७० कोटी रुपये (नेट) ची मोठी कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट भारतात कॉलिवूडच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘दुसरा रविवार’ नोंदवला आहे. त्याने रजनीकांत यांच्याच ‘२.०’ चित्रपटाच्या दुसऱ्या रविवारीच्या २४ कोटी रुपये (नेट) कलेक्शनला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारतात दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपट

– जेलर २ – २५.७० कोटी

– २.० – २४ कोटी

– लिओ – १६.५५ कोटी

– जेलर – १६.५ कोटी

– पोन्नियिन सेलवन १ – १५.७ कोटी

– द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम – १५ कोटी

३९० कोटी (नेट) कमाईसह ‘जेलर २’ सध्या भारतात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट आहे. अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी त्याला ‘२.०’ (४०७.०५ कोटी) ला मागे टाकावे लागेल, जे फक्त ६.३० कोटी दूर आहे. दुसऱ्या सोमवारी हा अॅक्शन-कॉमेडी थ्रिलर चित्रपट नक्कीच ‘२.०’ला मात देत कॉलिवूड (तमिळ सिनेमा)चा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून विक्रम रचेल.

टॉप १० सर्वाधिक कमाई करणारे कॉलिवूड चित्रपट

– २.० – ४०७.०५ कोटी

– जेलर २ – ३९८.७० कोटी (११ दिवस)

– जेलर – ३४८.५५ कोटी

– लिओ – ३४१.०४ कोटी

– कुली – २८५.०१ कोटी

– पोन्नियिन सेलवन १ – २६६.५४ कोटी

– द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम – २५२.७१ कोटी

– विक्रम – २४७.३२ कोटी

– अमरन – २२०.०५ कोटी

– जना नायकन – १९८.५७ कोटी

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language