Hashtagintro

IPL 2027: कोणत्या खेळाडूंना संघ कायम ठेवणार? रिटेन्शनची शेवटचा तारीख जाहीर, गोव्यात होणार ऑक्शन

आयपीएल 2027 अर्थात 20व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.आयपीएल 2027 साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. तसेच मागच्या पर्वातील उणीवा दूर करून संघ बांधणी सुरू केली आहे. आगामी पर्वासाठीचा लिलाव 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे.(Photo: IPL X Account) लिलावापूर्वी सर्व 10 संघांना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. सर्व फ्रेंचायझींना 15 नोव्हेंबर 2026 पूर्वी त्यांच्याद्वारे रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. (Photo: ANI) आयपीएल ट्रेड विंडो लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत खुली राहते. लिलावानंतर एका आठवड्याने ही विंडो पुन्हा सुरू होते. तसेच आयपीएल पर्व सुरू होण्याच्या एक महिना आधीपर्यंत खुली राहते. (Photo: ANI)  आयपीएल 2027 लिलावापूर्वी ट्रेड विंडो सुरू आहे. यापूर्वी काही फ्रेंचायझींनी खेळाडूंची अदलाबदल करण्याच्या फायदा घेतला आहे. ऋषभ पंत लखनौ सुपरजायंट्स सोडून दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला आहे, तर कुलदीप यादव दिल्ली सोडून लखनौमध्ये आला आहे . (Photo: IPL X Account) हार्दिक पांड्यापासून ते अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि सॅम करन या खेळाडूंच्या ट्रेडबाबत बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पण आतापर्यंत फक्त दोनच यशस्वी ट्रेड झाले आहेत. त्यातून चार खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी अनेक प्रमुख खेळाडूंना संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांसारख्या स्टार खेळाडूंना रिलीज करू शकते. दिल्ली कॅपिटल्स करुण नायर, पृथ्वी शॉ, रेहान अहमद, दुशमंथा चमीरा, काईल जेमिसन आणि आकिब नबी दार यांना रिलीज करू शकते. गुजरात टायटन्स ल्यूक वूड, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना रिलीज करू शकते . (Photo: ANI)

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language