वेळ बदलतेय आणि आजच्या पिढीसाठी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं ही एक सामान्य बाब आहे. समाजाने आता अशा गोष्टींकडे निषिद्ध म्हणून पाहू नये, असं काही दिवसांपूर्वी आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव म्हणालेली.
सध्याच्या जमान्यात अशा गोष्टी आपण सहजपणे बोलून जातो. पण चार दशकापूर्वी अभिनेत्री रेखाने या मुद्यावर ठाम भूमिका मांडली होती. त्यावेळच्या हिशोबाने तो क्रांतीकारक विचार होता. शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही. हा योगायोग आहे की मी कधी प्रेग्नेंट झाले नाही असं रेखा म्हणालेल्या.
लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं सामान्य बाब आहे. ज्या लोकांना असं वाटतं की, सुहागरातच्यावेळी जवळ आलं पाहिजे. ते रूढीवादी विचार ठेवतात. रेखाच्या या वक्तव्यावरुन सिद्ध होतं की, ती आपल्या काळच्या अभिनेत्रींपेक्षा पुढचा विचार करायची.
'फ्लिप द स्क्रिप्ट विद शुभ्रा' या यूट्यूब चॅनलवर जीनत अमानने लग्नाआधी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिलं पाहिजे असं म्हटलं होतं. आजच्या जमान्यात लिव-इन आधीपेक्षा जास्त गरजेचं झालं आहे असं म्हटलं होतं.
अभिनेत्री दीया मिर्झाने नेहमीच सामाजिक बंधनाच्या विषयावर मोकळेपणाने आपले विचार मांडले आहेत. लग्नाआधी शारीरिक संबंध आणि प्रेग्नेंसीच्या मुद्यावर दीया मिर्झाचं म्हणणं आहे की, हा कोणासाठीही व्यक्तीगत विषय आहे. दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यावर अधिकार सांगण्याऐवजी लोकांच्या व्यक्तिगत चॉइसचा सन्मान केला पाहिजे.
Source: TV9 Marathi Entertainment





