Hashtagintro

IND vs NZ: वैभव-अभिषेकच्या जोडीमुळे नाही तर श्रेयसच्या एका रणनीतीमुळे भारत जिंकला, मॅचनंतर ‘सरपंचसाहब’ स्पष्टच म्हणाला…

IND vs NZ: वैभव-अभिषेकच्या जोडीमुळे नाही तर श्रेयसच्या एका रणनीतीमुळे भारत जिंकला, मॅचनंतर ‘सरपंचसाहब’ स्पष्टच म्हणाला…

IND vs NZ 3rd T20: अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून ७.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी १३३ धावा जोडल्या. अभिषेक आणि वैभवच्या प्रभावी फलंदाजीच्या कामगिरीने सर्वांनाच धक्का बसला. आता भारतीय संघाच्या विजयानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरने विधान केले त्याची चर्चा होत आहे.

कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

सामन्यानंतर बोलताना, कर्णधार श्रेयस अय्यरने भारतीय फलंदाजांच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की”, ज्या पद्धतीने खेळाडू फटके खेळत होते, त्याने डोळे सुखावले आणि पूर्णपणे आश्चर्यकारक होते. जेव्हा मी आणि संजू फलंदाजीसाठी आलो होतो, तेव्हा चेंडू स्विंग होत होता, तर सलामीवीरांनी इतक्या सहजपणे धावा कशा केल्या याचे मला आश्चर्य वाटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अवघ्या पाच षटकांत १०० धावा झाल्याचे मी कधीही पाहिले नव्हते.”

परदेश दौऱ्यांवरील कठीण परिस्थिती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूंबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “जेट लॅग असूनही ज्या प्रकारे माझ्या सहकाऱ्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतली, त्याचं भरभरुन कौतुक करतो मी. १० षटकांनंतर जेव्हा भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर षटकार लगत होते, तेव्हा मी त्यांना अधिक वेळा यॉर्कर टाकण्यास आणि वाईड यॉर्कर टाकायला सांगितले. ज्यामुळे धावगती कमी होण्यास मदत झाली आणि न्यूझीलंडला २०० धावांच्या आत रोखण्यात यश आले.” श्रेयसच्या या विधानावरुन स्पष्ट होते की त्याच्या रणनीतीमुळे भारतीय संघाला विजय मिळण्यास मदत झाली आहे.

भारतीय संघाची ३-० अशी आघाडी

वेलिंग्टनमध्ये तिसरा टी२० सामना जिंकून भारताने मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी दोन्ही सामने क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल स्टेडियमवर खेळले गेले होते. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी ४ गडी राखून जिंकले होते. येथून पुढे, भारतीय संघ पुढील दोन सामने जिंकून क्लीन स्वीप पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असेल. न्यूझीलंडला येथून पुनरागमन करणे अत्यंत कठीण जाईल.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language