Hashtagintro

Chanakya Niti : या तीन ठिकाणी जपूनच बोला, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

Chanakya Niti : या तीन ठिकाणी जपूनच बोला, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी जपून बोलावं, माणसाच्या डोक्यावर नेहमी बर्फ असावा तर जीभेवर साखर. अनेक गोष्टी अशा असतात, ज्या पूर्ण होणार असतात, मात्र तिथे तुमचा कठोर स्वभाव अडवा येतो. त्यासाठी माणसाने नेहमी नम्र असावं, एकवेळ तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारलं तर ती जखम लवकर भरून निघते, मात्र तुमच्या शब्दांमुळे जर एखादा व्यक्ती दुखावला तर ती जखम कधीही भरून निघत नाही. त्यामुळे कोणाशी बोलताना आधी विचार करावा, आधी बोलून मग विचार करण्यापेक्षा विचार करूनच बोललेलं कधीही फायद्याचं असा सल्ला चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात असे तीन प्रसंग असतात, जिथे बोलताना तुम्ही आधी हजारदा विचार केला पाहिजे, आधी विचार करूनच मग बोललं पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

भांडणात मध्यस्थी – चाणक्य म्हणतात जेव्हा दोन व्यक्तींचे भांडण सुरू असतात, आणि तुम्ही जेव्हा अशा भांडणामध्ये मध्यस्थी करायला जाता, तेव्हा तुम्ही तुमचे शब्द जपूनच वापरले पाहिजेत. त्यातील एकालाही असं वाटायला नको की, तुम्ही फक्त एकाचीच बाजू घेत आहात. तुम्ही अशा ठिकाणी जेव्हा मध्यस्थी करण्यासाठी जाता, तेव्हा विचारपूर्वकच बोला. कारण तुमच्या बोलण्यामुळे एखाद्याचं मन दुखवायला नको, त्यामुळे तुम्ही कुठेही मध्यस्थी करण्यासाठी जात असाल तर काळजीपूर्वकच बोला, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वाटाघाटी करताना – चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, जिथे तुम्हाला कुटनीती स्थरावर वाटाघाटी कराव्या लागतात. तेव्हा अशावेळी कमीत कमी आणि विचारपूर्वक बोलणं हेच तुमच्या फायद्याचं आहे. समोरच्या व्यक्तीला कधीही तुमच्या मनाचा अंदाज लागू देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ज्ञानी लोकांशी संवाद -चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या ज्ञानी व्यक्तीशी बोलत असाल तेव्हा कमीत कमी बोला अन् जास्तीत जास्त ऐका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language