Hashtagintro

नाशिकमध्ये इंजिनीअरच्या मृत्यूने खळबळ; शेवटच्या पत्रातून धक्कादायक खुलासे; 28 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये इंजिनीअरच्या मृत्यूने खळबळ; शेवटच्या पत्रातून धक्कादायक खुलासे; 28 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?

पवन येवले, प्रतिनिधी : नाशिकमधील 28 वर्षीय इंजिनीअरच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. इंजिनीअरने मानसिक त्रास आणि धमक्यांना कंटाळून आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकला नोकरी करणाऱ्या तरुणाने गर्लफ्रेंडचा दुरावा आणि मारहाणीच्या त्रासातून आयुष्य संपवल्याचे समोर आलं आहे.

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील रहिवासी शिक्षक राजेंद्र भगवंतराव देसले पाटील यांचा मुलगा पवन राजेंद्र पाटील याने आत्महत्या केली. पवन पाटील हा नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गुन्ह्यातील संशयित तरुणी त्याची मैत्रीण असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यापासून दुरावा झाल्याने पवन तणावात आला होता. पवन हा गावी जळगावला आला होता. त्यावेळी तो प्रचंड तणावात असल्याचे कुटुंबीयाच्या लक्षात आले. त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने पोलीस पाटलाच्या मुलाने दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचे सांगितले. पवनने संशयित तरुणीला खूप पैसे दिले होते.  त्यानंतर तिने फोन-पेला ब्लॉक केले. त्यानंतर ओळखीच्या लोकांकडून सतत धमक्या मिळत असल्यामुळे पवन हताश झाला होता. पवन हा मानसिक त्रासाला व अपमानाला कंटाळला होता.

पवन पाटीलने पुढे दातीर नगर परिसरातील राहत्या घरात टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी पवनचं शेवटचं पत्र देखील जप्त केलं आहे. पवनने पत्रात त्याला कोणी आणि कसा त्रास दिला, याचा सविस्तर पाढा वाचलाय. त्याने मृत्यूआधी लिहिलेल्या पत्रात जयदीप पाटील, हेमंत जाधव आणि दोन संशयित तरुणीच्या नावाचा उल्लेख केला आहे. यानंतर पवन पाटीलने टोकाचा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद केले.

पोलिसांकडून तपास सुरू

पवन पाटीलला मारहाण आणि धमक्या दिल्याचा वडिलांचा तक्रारीत दावा आहे. पवन राजेंद्र पाटील याच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दोन तरुणींसह दोन तरुणांचा संशयितांमध्ये समावेश आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्राची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. नाशिकच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language