मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवार, 29 ऑक्टोबर ते शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रामुख्याने जेव्हीएलआर, एससीएलआर, बीकेसी कनेक्टर, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच धूळप्रवण असल्याचे निश्चित करण्यात आलेल्या इतर मार्गांवर राबवण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/28/bmc-crackdown-on-rmc-plants-begins-from-mumbai-mayor-ward-7-units-issued-notice-in-n-ward/
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त किरण दिघावकर नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवार,29 ऑक्टोबर ते शुक्रवार,6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/28/preserve-the-importance-of-the-historical-architecture-and-heritage-site-of-crawford-market-bmc-mayor-ritu-tawde-instructs-officials/
या विशेष मोहिमेसाठी सर्व सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांना मनुष्यबळ व यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या मोहिमेत या प्रमुख मार्गांवर साचलेली धूळ, गाळ व बांधकाम आणि पाडकाम (सी अँड डी) कचरा हटविणे, दुभाजक, मध्यभाग (मीडियन), पदपथ व कर्बस्टोन यांची स्वच्छता करणे; तसेच आवश्यकतेनुसार पाण्याची फवारणी व मिस्टिंग करणे, याबाबत सविस्तर कार्यान्वयन सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/28/mumbai-pune-to-host-90-day-cultural-mega-festival-under-bappacha-katta-initiative-for-folk-art/
सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांनी त्यांच्या संबंधित सहायक आयुक्तांच्या समन्वयाने दैनंदिन कृती आराखडा तयार केला आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेत समाविष्ट केलेली ठिकाणे, तैनात केलेली यंत्रसामग्री, गोळा केलेले कचऱ्याचे प्रमाण तसेच जिओ-टॅग केलेली ‘आधी व नंतर’ छायाचित्रे यांचा समावेश असेल.
Source: Prahaar News
