Hashtagintro

लिफ्टमध्ये आरसे का असतात? त्यामागे दडलंय एक महत्त्वाचं कारण

लिफ्टमध्ये आरसे का असतात? त्यामागे दडलंय एक महत्त्वाचं कारण

आता मोठमोठ्या इमारतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. अधुनिक इमारती असल्याने प्रत्येक इमारतीत दोन तरी लिफ्ट असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की लिफ्टमध्ये आरसा का असतो. अनेक जण लिफ्ट गेल्यानंतर केस निट करू लागतात, तर अनेक जण सेल्फी काढतात, पण खरंच विचार केला आहे का, लिफ्टमध्ये आरसे का असतात. याचं कारण कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण यामागे देखील फार मोठं कारण आहे. हे आरसे लिफ्टच्या रचनेचा एक भाग आहेत, जे प्रवाशांना अधिक आरामदायक अनुभव देण्यास आणि लिफ्टमधील गर्दीचे वातावरण बदलण्यास मदत करतात.

लिफ्टमध्ये पुरेशी जागा नसते आणि यामुळे अनोळखी लोकांशी अगदी जवळून संपर्क साधावा लागतो, हे काही लोकांसाठी अस्वस्थ करणारं असू शकतं. ज्यांना क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे लहान, बंद जागेची भीती आहे, त्यांच्यासाठीही लिफ्टचा प्रवास कठीण असू शकतो. अशा परिस्थितीत आरसे मदत करू शकतात. आरसे लिफ्टमधील भिंती आणि प्रकाश परावर्तित करून अधिक प्रशस्त जागेचा आभास निर्माण करू शकतात. जरी लिफ्टचा प्रत्यक्ष आकार बदलत नसला तरी, त्यामुळे ती आरसे असल्यामुळे अधिक मोकळी वाटू शकते. यामुळे प्रवाशांना जाणवणारा बंदिस्त वातावरणाचा दबाव कमी होण्यास मदत होईल.

लिफ्टमध्ये आरसे लावण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यांची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता. जेव्हा आतील प्रकाश आरशावर पडतो, तेव्हा लिफ्टमधील प्रकाश देखील वाढतो. यामुळे लहान आणि अंधारी जागेची भावना कमी होण्यासही मदत होते. घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांसारख्या ठिकाणी जागा मोठी दिसावी यासाठीही आरशांचा वापर केला जातो. याच डिझाइनची पद्धत लिफ्टमध्येही वापरली जाते. यामुळे जागेचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ न वाढवता अधिक प्रशस्त वातावरण निर्माण होते.

लिफ्टचा प्रवास जरी काही सेकंदांचाच असला तरी, कधीकधी तो खूप मोठा वाटू शकतो. याचं कारण असं असू शकतं की, तुम्हाला काही वेळ एकाच जागी उभं राहावं लागतं आणि अनोळखी लोकांशी बोलता येत नाही. आरसे प्रवाशांचं लक्ष विचलित करण्यास मदत करतात. स्वतःचा पेहराव पाहता येणं, कपडे नीट करता येणं आणि आजूबाजूला पाहता येणं यामुळे वाट पाहण्याचा कंटाळा कमी होऊ शकतो. लिफ्टच्या प्रवासादरम्यान कुठे पाहावं याची चिंता करणाऱ्या लोकांसाठीही आरसे एक नैसर्गिक लक्ष विचलित करणारं साधन ठरतात.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language