Hashtagintro

शेवटी आईचं काळीज! ‘दगडी चाळ’ सिनेमातील ‘तो’ सीन पाहून आई…कमलेश सावंत यांनी सांगितला भावुक किस्सा

‘दृश्यम या चित्रपटात मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत यांनी या चित्रपटाच्या तिन्ही भागात इन्स्पेक्टर गायतोंडेची भूमिका साकारली. ही भूमिका त्यांनी इतकी चोख वठवली की, गायतोंडे म्हणताच प्रेक्षकांच्या डोक्यात तिडिक जाते. पडद्यावर जरी त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत साधे आणि हळवे आहेत. त्यांची हीच भावनिक बाजू नुकत्याच एका मुलाखतीत पहायला मिळाली. ‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत कमलेश सावंत त्यांच्या आईविषयी बोलताना भावूक झाले.

दगडी चाळ’मधील तो प्रसंग पाहून आई झाली होती भावूक

कमलेश सावंत यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आईविषयी अनेक आठवणी सांगितल्या. त्यांची आई आवडीने त्यांचे चित्रपट पाहायला जायची. कमलेश यांच्या पत्नीही त्यांना चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन जायच्या. ‘दगडी चाळ’ चित्रपट पाहताना कमलेश यांची इन्स्पेक्टर काळे ही भूमिका पाहून त्यांच्या आईला वाईट वाटलं होतं. चित्रपटाच्या शेवटी त्यांच्या इन्सपेक्टर काळे या पात्राला मारलं जातं, हे पाहून आई हळहळली होती.

आईच्या मायेचा तो खास अनुभव

कमलेश यांनी आईशी संबंधित आणखी एक आठवण सांगितली. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असताना डॉक्टरांनी त्या जागेवर चोळू नये, असं सांगितलं होतं. मात्र, आईने तेल लावून त्यांच्या पायाची मालिश केली. आईच्या मायेची आठवण सांगताना त्यांच्या भावना दाटून आल्या अन् ते म्हणाले शेवटी आईचं काळीज…

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

आईच्या निधनानंतर आयुष्यात निर्माण झाली पोकळी

कमलेश सावंत यांनी आईच्या निधनानंतरचा कठीण काळही सांगितला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या आईचं निधन झालं. त्या 24 दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “आईच्या निधनानंतर माझ्या बऱ्याच सवई कायमच्या बंद झाल्या.”

आईच्या आजारपणात तिने सोसलेला त्रास आणि तिच्या डायरीत लिहिलेल्या गोष्टी आठवून कमलेश भावूक झाले. “माझ्यासाठी फक्त आईच होती, बाकी कोणीच नव्हतं,” असं सांगताना त्यांच्या मनातील आईविषयीचं प्रेम स्पष्टपणे जाणवलं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language