Hashtagintro

Snake Fact: साप गिळल्यानंतर ऊंटावर काय होतो परिणाम? मान्यता वाचून बसेल धक्का

Snake Fact: साप गिळल्यानंतर ऊंटावर काय होतो परिणाम? मान्यता वाचून बसेल धक्का

Camel Snake Fact: सापाविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. तर त्याविषयीच्या लोककथाही सर्वसामान्यांत रूचीने ऐकल्या जातात. त्यावर अनेकांचा विश्वासही असतो. साप गुप्तधनावर कुंडली मारून बसतो हा एक गैरसमज प्रचलित आहे. पण पार दूर तिकडे अरबस्थानातही सापाविषयीच्या विचित्र प्रथा आहेत हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. ऊंट आणि सापाचा हा प्रयोग वाचून तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.

ऊंटाला गिळायला लावतात जिवंत साप

तर वाळवंटातील जहाज म्हणून ऊंट प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशात ऊंट हा दळणवळणाचा सर्वात मोठा आधार आहे. पण पारंपारिक आख्यायिकांनुसार, ऊंटांना जिवंत विषारी अथवा बिनविषारी साप गिळायला देतात. खायला देतात. ऐकायला हे जरा विचित्र वाटत असले तरी अनेक भागात ही जुनी परंपरा जपली आहे. यामागील मान्यताही तशीच रंजक आहे.

हयम आजारावर प्रभावी उपायाचा दावा

मध्य-पूर्वेतील काही ग्रामीण भागांमध्ये ऊंटांना जिवंत विषारी अथवा बिनविषारी साप गिळायला देतात. ऊंटांना हयम नावाच एक गंभीर आजार जडतो. यामध्ये सापाची खाण्या-पिण्याची वासना संपते. तो काहीच खात पित नाही. अशावेळी त्याचे शरीर अशक्त होते. त्याला सुस्ती चढते आणि गुंगीतच तो प्राण सोडतो. या आजारावर झाडपाल्याचा जुन्या काळी उपाय करण्यात येत असे. पण त्यासोबतच ऊंटाचे तोंड बळेच उचकटून त्याच्या घशात एक जिवंत विषारी अथवा बिनविषारी साप सोडतं आणि नंतर पाणी पाजत. यामुळे हा साप पाण्याच्या प्रवाहासोबत ऊंटाच्या पोटात जाई. साप पोटात गेल्यावर सापाचे विषाच्या प्रयोगामुळे ऊंटाच्या शरीरातील संसर्ग संपतो आणि ऊंट पुन्हा ठणठणीत बरा होतो, असा काहीसा हा समज आहे.

विज्ञानात दाव्याला कुठंय स्थान?

आता ही वाळवंटी प्रदेशातील लोकांची एक परंरपार, रुढी, अंधश्रद्धा आहे. पण विज्ञानाच्या कसोटीवर हा दावा फोल ठरतो. जिवंत साप पोटात सोडल्याने आजार बरा होतो, हा दावा विज्ञान खोडून काढते. आता प्राणीतज्ज्ञ, पशूतज्ज्ञ उपलब्ध आहेत. जनावरांच्या विविध रोगांवर दर्जेदार औषधोपचार उपलब्ध असल्याने साप खाऊ घालून ऊंट बरा होतो, ही मान्यता विज्ञानाच्या कसोटीवर खोटी ठरते.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language