Hashtagintro

ही तर हद्द झाली ! सलमान-ऐश्वर्याचा जुना फोटो शेअर करणं भन्साळी प्रॉडक्शनला पडलं महागात; नेटकरी संतापले!

ही तर हद्द झाली ! सलमान-ऐश्वर्याचा जुना फोटो शेअर करणं भन्साळी प्रॉडक्शनला पडलं महागात; नेटकरी संतापले!

Aishwarya Rai And Salman Khan : अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी आजही चाहत्यांच्या मनात खास स्थान टिकवून आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. चित्रपटातील करवा चौथचा सीन आणि त्यातील गाणं आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. मात्र, यंदाच्या करवा चौथनिमित्त शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या Bhansali Productions या प्रोडक्शन हाऊसने करवा चौथच्या निमित्ताने सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा चित्रपटातील एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघेही चंद्राच्या पार्श्वभूमीवर दिसत आहेत. मात्र, ही पोस्ट समोर येताच अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रोडक्शन हाऊसला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पोस्टमध्ये नेमकं काय होतं?

Bhansali Productions ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी खास कॅप्शनही लिहिलं होतं. “काही फोटो, काही आठवणी आणि प्रेमाची एक सुंदर कहाणी! हॅप्पी करवा चौथ!” विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनाही टॅग करण्यात आलं होतं. याच गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली.

 

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या वैयक्तिक आयुष्यातील भूतकाळ लक्षात घेता, अशा प्रकारे दोघांचा रोमँटिक फोटो शेअर करणं आणि त्यांना एकत्र टॅग करणं योग्य नसल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं. काहींनी प्रोडक्शन हाऊसच्या या कृतीवर टीका करत याला बेजबाबदारपणा असल्याचं सांगितलं.

काही युजर्सनी या पोस्टला ‘शुद्ध वाईट’ असंही म्हटलं. तर काहींनी जुन्या नात्यांशी संबंधित आठवणी अशा प्रकारे पुन्हा चर्चेत आणण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला.

मात्र, काही चाहत्यांनी या पोस्टकडे केवळ चित्रपटातील समीर आणि नंदिनी यांच्या आठवणी म्हणून पाहिलं. त्यांच्या मते, हा फोटो दोन कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडण्याऐवजी चित्रपटातील एका सुंदर क्षणाची आठवण म्हणून पाहायला हवा. एकूणच, करवा चौथच्या निमित्ताने केलेल्या या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language