Hashtagintro

Simhastha Kumbh Mela Nashik 2027| सिंहस्थ कुंभपर्वास आज प्रारंभ, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज धर्मध्वजारोहण

nashik kumbh mela 2027 begins president murmu dhwajarohan

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वाचा औपचारिक प्रारंभ शनिवारी (दि. ३१) रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने होणार आहे. तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजाची स्थापना केली जाणार आहे. यावेळी गोदावरी पूजन आणि यज्ञविधीही पार पडतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या धर्मध्वजारोहण सोहळ्याने आगामी सिंहस्थ पर्वाची धार्मिक नांदी होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी गोदावरी तीरावर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राष्ट्रपतींचे सकाळी ९ वाजता ओझर विमानतळावर आगमन नंतर ११ वाजता त्या रामतीर्थ परिसरात दाखल होतील. यज्ञात समिधा अर्पण आणि गोदावरी पूजनानंतर मुख्य ध्वजारोहण होईल. त्यानंतर दुपारी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर गोदापूजन आणि ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन व पूजाविधी होणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होतील.

यावेळी शृंगेरीपीठाचे शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्यासह चार जगद्गुरू आणि तेरा आखाड्यांचे साधू-महंत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. सुमारे दोनशे वर्षांनंतर शैव-वैष्णव परंपरेतील संत-महंत एकत्र येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाआरतीच्या विश्वविक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पुरोहित संघातर्फे राष्ट्रपतींना पद्मपुराणातील श्लोक आणि अमृतकुंभधारी गरुडाचे कोरीवकाम असलेले विशेष ताम्रपत्र भेट देण्यात येणार आहे. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील दोन्ही कार्यक्रमांसाठी एकूण १ हजार ३१७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले असून, राज्य मंत्रिमंडळातील २१ मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language