Hashtagintro

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून प्रवास करणाऱ्या 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2026 पासून होणार आहे. त्यामुळे नियमित बसप्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या बसप्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला पीएमपीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयानुसार सर्व बस मार्गांवरील नियमित प्रवास तिकिटांच्या दरात निम्मी सवलत लागू होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/the-commencement-of-the-simhastha-kumbh-mela-will-be-heralded-by-the-ceremonial-hoisting-of-the-religious-flag-by-the-president/
70 रुपयांचा दैनिक पास आता 35 रुपयांत
ज्येष्ठ नागरिकांना केवळ प्रवासाच्या तिकिटातच नव्हे, तर दैनिक पासमध्येही सवलत मिळणार आहे. यापूर्वी 70 रुपयांना मिळणारा पीएमपीएमएलचा दैनिक पास आता 35 रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दिवसभरात अनेकदा बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या खर्चात बचत होईल.

सवलतीसाठी वयाचा पुरावा आवश्यक
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकाचे वय 60 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान वयाचा वैध पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक असेल. यासाठी पॅनकार्ड किंवा पीएमपीएमएलचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र दाखवता येणार आहे.
तसेच वयाचा पुरावा म्हणून सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रावर संपूर्ण जन्मतारीख नमूद असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अधिक परवडणारे होणार असून, त्यांच्या दैनंदिन प्रवासावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language