मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पूल सध्या मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याने, राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर ही एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या दोन महिन्यांत अंजणारीच्या वळणावर तब्बल १२ अपघात झाल्याची नोंद आहे, ज्यामुळे हे स्थळ ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते. या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून, राष्ट्रीय महामार्ग विभागाने अंजणारीला पर्यायी मार्गाचा सर्व्हे सुरू केला आहे. अंजणारीवरील स्टॉप येथून हा पर्यायी मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम नेहमीच चर्चेत राहिले आहे, परंतु आता अंजणारी येथील अपघातांची वाढती संख्या पाहता, या ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पर्यायी मार्गामुळे अंजणारी पुलाजवळ होणारे अपघात कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा आहे. टीव्ही ९ मराठीसाठी मनोज डेले, रत्नागिरी.
Source: TV9 Marathi National
