Hashtagintro

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000 ? लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये आता १,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळत असल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये मिळणार की केवळ १,५०० रुपये, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती.

लाडक्या बहिणींना मिळणार १,५०० रुपये
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. अखेर या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र महिलांच्या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत.

हप्त्यासाठी ३४४.६२ कोटींचा निधी
सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणापूर्वी खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिलांना घरखर्च आणि सणाच्या खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language