Hashtagintro

Narendra Modi: एकता नगरचे भव्य वर्षावन; बाराही महिने मान्सूनचा अनुभव आणि काचेचा स्कायवॉक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील एकता नगर (केवडिया) येथे एका भव्य आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘रेनफॉरेस्ट’ (वर्षावन) प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अगदी शेजारी वसलेले हे 12 एकरचे इको-टुरिझम पार्क पर्यटकांना निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाते. येथे पाऊल ठेवताच सभोवतालची हिरवळ आणि शांतता मनाला एक वेगळाच आनंद देते. निसर्गप्रेमींसाठी हे नवीन पर्यटन स्थळ एक उत्तम पर्वणी ठरत आहे. (Photo: Facebook) या रेनफॉरेस्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील कृत्रिम पावसाची यंत्रणा. संपूर्ण जंगलात 20 भव्य ‘रेन-गन टॉवर्स’ उभारण्यात आले आहेत, जे हवेत पाण्याचे तुषार उडवून सतत रिमझिम पावसाचा आभास निर्माण करतात. त्यामुळे उन्हाळा असो वा हिवाळा, येथे येथे येणाऱ्या पर्यटकांना बाराही महिने खऱ्याखुऱ्या मान्सूनचा आणि धुक्याचा थरारक अनुभव घेता येतो. (Photo: Facebook) थ्रिलची आवड असणाऱ्यांसाठी येथे 220 मीटर लांबीचा एक चक्राकार काचेचा स्कायवॉक ब्रिज (Glass Skywalk Bridge) तयार करण्यात आला आहे. मजबूत जर्मन काचेचा वापर करून बनवलेल्या या पुलावरून चालताना खाली पसरलेले घनदाट जंगल आणि समोर जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळा स्पष्ट दिसतो. हा स्कायवॉकवरील प्रवास पर्यटकांच्या चांगलाच लक्षात राहणारा आहे. (Photo: Facebook) या रेनफॉरेस्टमध्ये वनस्पतींचा एक मोठा आणि दुर्मिळ खजिना पाहायला मिळतो. भारताच्या कानाकोपऱ्यातून, म्हणजेच ठेवा हिमालय, पश्चिम घाट आणि अंदमान-निकोबार बेटांवरून आणलेल्या 450 हून अधिक प्रजातींची सुमारे 60,000 पेक्षा जास्त सदाहरित झाडे येथे लावण्यात आली आहेत. यामुळे पर्यटकांना एकाच छताखाली भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडते. (Photo: Facebook) निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच येथे एक विशेष ‘इंटरएक्टिव्ह संवर्धन केंद्र’ (Conservation Hub) देखील बनवण्यात आले आहे, जिथे लहान मुलांना पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाची माहिती मिळते. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले असणारे हे पार्क कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वीकेंडला भेट देण्यासाठी एक परिपूर्ण आणि शैक्षणिकदृष्ट्या उत्तम ठिकाण बनले आहे. (Photo: Facebook)

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language