Hashtagintro

Maharashtra Epstein Files Trailer: भविष्याच्या रेषा भोंदूबाबा ठरवत असतील तर बाबा होण्यातच फायदा; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’चा ट्रेलर पाहिलात का?

Maharashtra Epstein Files Trailer: भविष्याच्या रेषा भोंदूबाबा ठरवत असतील तर बाबा होण्यातच फायदा; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’चा ट्रेलर पाहिलात का?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सध्या तुरुंगात असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित असल्याची चर्चा रंगली आहे. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘चमत्कार को ही नमस्कार करते है लोग, एक हाथ से देव एक हाथ से लेव..!’ असा डायलॉग ऐकू येतोय. एकंदरीत ट्रेलरमध्ये अंधश्रद्धा, सत्ता आणि राजकीय हितसंबंधांचे जाळे दाखवण्यात आले आहे. एक भोंदूबाबा स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करतो आणि महिलांचे शोषण करत असल्याचे दिसत आहे. पण एकदिवस त्याचे सत्य सर्वांसमोर येते. बाबा थोरात हा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. तसेच खरात आणि थोरात यांच्या लूकमध्ये देखील साम्य असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणते कलाकार दिसणार?

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी दिसत आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेता सुबोध भावे, माधुरी पवार हे कलाकार देखील दिसणार आहेत. सध्या चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

सध्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे राज्यातील उच्चस्तरीय राजकीय व सामाजिक वर्तुळातील अनेक गुपिते बाहेर आणणार असल्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेक अडचणी आल्या होत्या. पण आता अखेर या चित्रपटाला हिरवा सिग्नल मिळाला आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language