Hashtagintro

Shakti Kapoor: शक्ती कपूर यांच्यावर बायकोपुढे भीक मागण्याची आलेली वेळ, सतत विनवण्या करायचे कारण…

Shakti Kapoor: शक्ती कपूर यांच्यावर बायकोपुढे भीक मागण्याची आलेली वेळ, सतत विनवण्या करायचे कारण…

Shakti Kapoor: बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची पहिली ओळख सिनेमाच्या सेटवरच झालेली. शिवांगी तेथे बाल कलाकार म्हणून काम करत होते, तर शक्ती कपूर एका वृद्धाची भूमिका साकारत होते. शक्ती आणि शिवांगी यांच्यामध्ये 12 वर्षांचं अंतर आहे… पहिल्या नजरेतच शक्ती कपूर यांना शिवांगी यांच्यावर प्रेम झालेलं. दोघे एकमेकांना पसंत देखील करु लागलेले. तेव्हा शक्ती यांनी शिवांगी यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला. पण शक्ती यांची अशी इच्छा होती की, त्यांच्या बायकोने अभिनय आणि गायन सोडून गृहिणी म्हणून आयुष्य जगावं… ज्यासाठी शिवांगी मुळीच तयार नव्हत्या. यासाठी शक्ती कपूर यांनी शिंवागी यांच्यासमोर सतत विनवण्या कराव्या लागल्या. एका मुलाखतीत शक्ती म्हणालेले, ‘गृहिणी होण्यासाठी मी शिवांगी हिच्यापुढे भीक देखील मागितली आहे.’

एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणालेले, शिवांगी गर्लफ्रेंड असताना त्यांच्यापुढे शक्ती यांनी भीक मागितली होती. शिवांगी यांनी शक्त कपूर यांचं म्हणणं ऐकलं. यावर शक्ती कपूर म्हणालेले, ‘शिवांगीने तेव्हा घेतलेल्या निर्णयासाठी मी आजही तिचे आभार मानतो… तिने फार मोठं त्याग माझ्यासाठी केलं आहे. आजही तिच्यासमोर हात जोडतो, कारण तिने जे केलं ते सोपं नव्हतं…’

शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीत हेसुद्धा सांगितलं की, जेव्हा दोघांचं लग्न झालं. तेव्हा दोन्ही कुटुंबातील मंडळी या नात्यावर खूश नव्हती. शक्ती आणि शिवांगी यांच्या लग्नासाठी कुटुंबियांचा नकार होता. कारण शक्ती यांनी शिवांगी यांच्यापुढे ठेवलेली अट त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हती.

नात्याला कुटुंबियांचा नकार असल्याने दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेताल. 1982 मध्ये शक्ती कपूर यांनी शिवांगी कोल्हापुरी यांच्याशी लग्न केलं. शक्ती कपूर यांनी सांगितलं की, शिवांगी यांनी त्यांच्यासाठी आपला अभिनय आणि गायनाचा करिअर पूर्णपणे सोडला होता. शिवांगी यांच्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय नाराज होते; तर दुसरीकडे शक्ती कपूर यांच्या घरचेही या लग्नामुळे नाराज होते, परंतु जसा मुलगा सिद्धांत याचा जन्म झाला, तशी दोन्ही कुटुंबांची नाराजी दूर होऊ लागली. 1987 मध्ये श्रद्धा कपूरचा जन्म झाला आणि त्यानंतर ते एक आनंदी आयुष्य जगत आहेत.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language