Hashtagintro

Nita Ambani Birthday : अंबानी कुटुंबाचा आजवरचा सर्वात मोठा निर्णय, 5000 लोकांना देणार घर; काय आहे योजना?

Nita Ambani Birthday : अंबानी कुटुंबाचा आजवरचा सर्वात मोठा निर्णय, 5000 लोकांना देणार घर; काय आहे योजना?

नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबांनी कुटुंबाने मोठा निर्णय घेतला आहे. अंबानी कुटुंब 5 हजार लोकांना घर देणार आहे. नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथे 100 एकरवर एक केअर टाउनशीप तयार करण्यात येणार आहे. नीता अंबानी यांनी या टाऊनशीपचा शिलान्यास केला आहे. या योजनेचं नाव ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ असं ठेवण्यात आलं आहे. या योजनेतून 5 हजाराहून अधिक लोकांना घर देण्यात येणार आहे. अनाथ मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना ही घरे देण्यात येणार आहे.

कर्जत येथे झालेल्या या भूमीपूजन आणि शिलान्यासाच्या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित होते. रिलायन्स फाऊंडेशनद्वारे ही टाऊनशीप उभारण्यात येत आहे. अनेक टप्प्यात स्थायी आणि गैर लाभार्थी संस्थे (NPO)च्या रुपात ही टाऊनशीप उभारली जाणार आहे. या ठिकाणी केवळ घरेच बांधली जाणार नाहीत. तर या ठिकाणी आरोग्य सेवा असेल, शाळा असेल, पूनर्वसन सुविधा असतील, शिक्षण, रोजगार आणि मनोरंजनाच्या गोष्टीही उपलब्ध राहणार आहेत.

बुजुर्गांनाही घरे

दिव्यांग, घरांची गरज असलेली अनाथ मुलं, देखभाल आणि आरामाच्या शोधात असलेले बुजुर्ग आदींसाठी ही घरे असणार आहे. या ठिकाणी मेडिकल सुविधांसह कौटुंबिक वातावरण तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी राहणाऱ्यांना शिकण्याची, काम करण्याची, मित्र बनवण्याची, सणांमध्ये सहभागी होण्याची आणि इतर कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मिळणार असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या.

8 गावांची निर्मिती

रिलायन्स फाऊंडेशनच्या मते, या टाऊनशीपमधून सुमारे 15,000 लोकांना लाभ मिळणार आहे. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची काळजी घेणारे कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबांचाही समावेश असणार आहे. या टाऊनशीपमध्ये 8 गावांची निर्मिती केली जाणार आहे. या सर्व गावांची नावे भारतातील पवित्र नद्यांच्या नावांनी ठेवली जाणार आहे. या ठिकाणी राहणाऱ्यांसाठी छोटी छोटी घरे बनवली जाणार आहेत. या ठिकाणी कौटुंबीक वातावरण असणार आहे. या ठिकाणी हाऊस पॅरेंटस आणि केअरगिव्हर्स तैनात राहणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या रुमला आपल्या पद्धतीने सजवण्याची आणि आपल्या घरासारखं बनवण्याची सुविधा मिळणार आहे.

सुसज्ज रुग्णालय

या ठिकाणी स्पेशालाइज्ड रुग्णालय बनवण्यात येणार आहे. फिट येण्यावर उपचार केले जातील. काही लोकांसाठी दंत चिकित्सांची सुविधा असेल. पॅलिएटिव्ह केअर आणि अन्य मेडिकल सुविधाही मिळेल. याशिवाय फिजिओथेरपी, ऑक्यूपेशनल थेरेपी, स्पीच थेरेपी आणि हायड्रोथेरपीसाठी रिहॅबिलिटेशन सेंटरही बनवले जाणार आहेत.

वनताराच्या धर्तीवर फार्म

या टाऊनशीपमध्ये मंदिर, बाग, शेती, खेळाचे मैदान, वर्कशॉप आणि कॅपे तसेच सर्वांसाठी खेळ आणि मनोरंजनाच्या सुविधा असणार आहेत. प्राण्यांसोबत वेळ घालवण्यासाठी खास फार्म बनवलं जाणार आहे. वनताराच्या धर्तीवर हे फार्म असणार आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language