
Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात केली आणि अभिनेत्री आज आनंदी आयुष्य जगत आहे. पण परदेशात कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी सोनाली आणि पती गोल्डी यांच्यावर भायनक परिस्थिती ओढावलेली होती. कॅन्सरच्या उपचारांमुळे सोनालीचं टक्कल झालेले. शिवाय ती व्हिलचेअर होती आणि अभिनेत्री त्या अवस्थेत कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची मोठी गर्दी जमलेली… तेव्हा रुग्णालयात काय झालेलं… यावर सोनाली हिने मोठा खुलासा केले आहे.
एका मुलाखतीत सोनाली हिला विचारण्यात आलं, तुझा केस नसलेला फोटो आणि मला ठाऊक आहे की, तो माझ्या एकटीसाठी नाही तर असंख्या माणसांसाठी डोळे उघडणारा ठरला असेल… यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला गोल्डी म्हणालेला की, त्याच्यावर प्रचंड चर्चा झालेली, सर्वत्र फक्त माझीच चर्चा होती. लोकांचे आम्हाला बाहेरुन फोन यायला लागले होते की, रुग्णालयाच्या बाहेर मीडिया उभी आहे…. लोकं त्याला रुग्णालयाबाहेरची परिस्थिती सांगत होते, त्यामुळे त्याने मला विचारलं, आपण आता काय केलं पाहिजे, थोडा वेळ वाट पाहायची का? की बाहेर पडण्यासाठी वेगळा कोणता मार्ग पाहायचा?’
पुढे सोनाली म्हणाली, ‘आणि मला आठवत आहे, मी सुद्धा विग घालण्याचा प्रयत्न करत होती आणि व्हिलचेअरमध्ये होती. त्यामुळे बाकीचं सगळं सामान येईलपर्यंत आम्ही फक्त विचार करत होतो की काय केलं पाहिजे. तेव्हा मला मीडियाला पाहायचं नव्हतं, पण तो फोटो समोर येणारच होता, त्यामुळे जे आहे ते मी स्वीकारलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेवढं तुम्ही लपवता, तेवढं ती लोकं मागे धावतात, ते क्लिक करण्यासाठी. म्हणून मी सुद्धा ज्या परिस्थितीत होते, तशी समोर आले.’
‘त्यापुढे चर्चा होणारच होत्या, हे मला माहिती होतं, ‘हे काय आहे, केस नाही… तर काय केस नाहीत तर. नाही आहेत…’ यामध्ये आता गॅसिप करण्यासारखं काय? जे आहे ते मी स्वीकारलं होतं…’ असं थेट सोनाली बेंद्रे म्हणालेली… कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर सोनाली हिने नव्याने आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्री आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Source: TV9 Marathi National
