Hashtagintro

Reliance Industries : मुकेश अंबानींच्या रिलायन्सची शेअर बाजारात कमाल, अवघ्या 45 मिनिटात थक्क व्हाल इतका पैसा कमावला

Reliance Industries : मुकेश अंबानींच्या रिलायन्सची शेअर बाजारात कमाल, अवघ्या 45 मिनिटात थक्क व्हाल इतका पैसा कमावला

चालू वर्षात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जवळपास 28 टक्के घसरण झाली होती. या वातावरणात जियो प्लॅटफॉर्मचा IPO आला. त्याने शेअर बाजारातील सर्व रेकॉर्ड मोडले. जियो प्लॅटफॉर्म देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. पण अपेक्षेनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये कुठलीही उसळी दिसली नाही. आता सर्व अपेक्षा तिमाहीच्या निकालावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी संध्याकाळी आपलं रिपोर्ट कार्ड जगासमोर ठेवलं. रिझल्टनुसार रिलायन्सच्या नेट प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर 41 टक्के उसळी दिसून आली. मागच्या काही वर्षात पहिल्यांदा हे पहायला मिळालय. याचा परिणाम सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर दिसून आला.

BSE त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यापेक्षा जास्त तेजी पहायला मिळाली. कंपनीचं वॅल्यूएशन फक्त 17 लाख कोटीच्या पुढे गेलं नाही तर 1.29 लाख रुपये कोटीचा फायदाही झाला. जाणकारांनुसार येणाऱ्या दिवसात रिसायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जास्त तेजी सुद्धा पहायला मिळू शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये कसे आकडे आहेत जाणून घेऊया.

नुकसानीची भरपाई होऊ शकते

बीएसईच्या आकड्यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1,227.40 रुपयांवर ओपन झाला. पाहता, पाहता 45 मिनिटात 1,259 रुपयांवर जाऊन पोहोचला. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1,163.55 रुपयांवर बंद झालेला. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी कंपनीचा शेअर 7.72 टक्क्यांसह 1253.40 रुपयांवर व्यवहार करतोय. शेअर्समध्ये अशीच तेजी राहिली तर कंपनीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई होऊ शकते.

शेअर जेव्हा दिवसातील सर्वात हायवर पोहोचलेला, तेव्हा..

रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील या तेजीमुळे कंपनीच्या वॅल्यूएशनमध्ये 1.29 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त वाढ झाली आहे. आकड्यांनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जेव्हा दिवसातील सर्वात हायवर पोहोचलेला, त्यावेळी कंपनीचं वॅल्यूएशन 17,04,357.77 कोटी रुपये पहायला मिळालेलं. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 15,75,143.36 कोटी रुपये होती. म्हणजे दिवसाच्या व्यवहारात कंपनीच्या वॅल्यूएशनमध्ये 1,29,214.41 कोटी रुपयांचा फायदा झाला.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language