Hashtagintro

Mahesh Tilekar : असूया जाणवली! लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर कार्यक्रम, बाईट देण्यास ‘महानटा’चा नकार; महेश टिळेकरांनी सांगितला प्रसंग

Mahesh Tilekar : असूया जाणवली! लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर कार्यक्रम, बाईट देण्यास ‘महानटा’चा नकार; महेश टिळेकरांनी सांगितला प्रसंग

दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मुलाखतींमध्ये ते इंडस्ट्रीतील अनुभव शेअर करतात. एका मुलाखतीदरम्यान महेश टिळेकर यांनी इंडस्ट्रीतील ‘महानटा’चा अनुभव सांगितला आहे. महेश टिळेकर म्हणाले की, ‘लक्ष्मीकांत बेर्डेनं जेव्हा-जेव्हा माझ्याकडे काम केलं, तेव्हा त्यानं कधीच पैशांचा विचार केला नाही. त्यामुळे तो जेव्हा गेला, तेव्हा मी असा विचार केला, त्याच्यासाठी काहीतरी कार्यक्रम करायचा. म्हणून मी ‘लाडका लक्ष्या’ नावाचा कार्यक्रम केला. सगळे कलाकार आणि त्याच्या नातेवाईकांना बोलावलेलं. त्यावेळी एका वाहिनीला मी म्हटलं तुम्ही पैसे देऊ नका, तो कार्यक्रम मी करेन, तुम्ही फक्त प्रसारित करा.’

‘महानटा’नं खोट्यात पाडलं

महेश टिळेकर पुढे म्हणाले की, ‘त्या कार्यक्रमासाठी फक्त लक्ष्मीकांतसोबत काम केलेल्या कलाकारांचे बाईट हवे होते. काहींनी दिले. मी त्या ‘महानटाला’ विचारलं. त्यानं होकार दिला आणि मी त्यानं सांगितलेल्या ठिकाणी गेलो. त्याचं फोटोशूट चालू होतं. त्यामुळे, एक-दीड तास मी थांबलो. त्यांचं शूटिंग झाल्यानंतर त्याला माईक लावला. त्यानं विचारलं, ‘हे कोणत्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे?’ मी त्या वाहिनीचं नाव सांगितलं. ते नाव ऐकताच त्यानं माईक काढला आणि ठेवला. ‘महानट’ म्हणाला, ‘त्या वाहिनीवर असेल तर मी नाही बाईट देणार. कारण, मी एका दुसऱ्या वाहिनीवर रिऍलिटी शो करतोय, त्यामुळे मला करता येणार नाही. त्यानं मलाच खोट्यात पाडलं.’

‘मी तिथून निघालो आणि तो ज्या वाहिनीसाठी काम करणार होता, त्यांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. ते पण म्हणाले, अभिनयासाठी अशी अट असते, पण बाईट द्यायला काहीच हरकत नाही. तेव्हा मला समजलं, मुद्दाम त्या ‘महानटानं’ मला बाईट दिलेला नाही. कारण, नवीन कोणी काहीतरी करतंय म्हटल्यावर असूया असते, ती मला जाणवली.’ असं महेश टिळेकर यांनी शेवटी सांगितलं. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश टिळेकर बोलत होते.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language