Hashtagintro

Diwali Gold Rate 2026: दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावाने घेतली मोठी झेप; भाव ऐकून बसेल धक्का!

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच सोन्या-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरणीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींनी अचानक उसळी घेतली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.

सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ
सराफ बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 200 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 1 लाख 42 हजार 346 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत बाजारात सोन्याचे भाव थोडे नरमला होते, मात्र या अचानक झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना आता खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

चांदीत तब्बल एक हजार रुपयांची उसळी
फक्त सोनेच नव्हे, तर चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. सराफ बाजारात चांदीच्या किमतीत एकाच दिवसात तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा भाव थेट 1 लाख 88 हजार 490 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदीचे दागिने, भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर मोठा ताण येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/02/what-are-green-firecrackers-how-much-safer-are-they-compared-to-regular-firecrackers/
धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांचे बाजाराकडे डोळे
भारतीय संस्कृतीमध्ये धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांपासून ते मोठे गुंतवणूकदार या काळात आवर्जून मौल्यवान धातूंची खरेदी करतात. मात्र, ऐन सणाच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली ही अचानक वाढ ग्राहकांच्या खरेदीच्या नियोजनावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांतील दरघसरणीनंतर झालेली ही दरवाढ तात्पुरती आहे की आगामी काळातही सोन्या-चांदीचे भाव असेच गगनाला भिडणार, याबाबत सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा मिळणार की दरवाढीचा फटका सहन करावा लागणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language