Hashtagintro

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? नाराजीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले…

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? नाराजीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी पक्षात मोठे निर्णय घेतले जात असताना डावलं जात असल्यानं नाराजी व्यक्ती केली होती, अशी माहिती सुत्रांकडून समोर आली होती. दरम्यान त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? 

राज्यात दुष्काळ आहे, या दुष्काळासंदर्भात पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. दुष्काळासंदर्भात पक्ष काय कारवाई करणार यावर चर्चा झाली. उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. आजच्या बैठकीमध्ये पक्षाच्या सध्या सुरू असलेल्या एकंदरीत कामकाजावर तसेच एकसंघपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात कशापद्धतीने पक्षाला काम करता येईल यावर चर्चा झाली.

दरम्यान या बैठकीमध्ये विलिनिकरणावर देखील काही चर्चा झाली का? असा प्रश्नही यावेळी सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, विलिनिकरणाच्या मुद्द्यावर केव्हाच पडदा पडला आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील विलिनिकरणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आमच्या पक्षाने देखील त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली आहे, असं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

पक्षात कुठलीही नाराजी नाही, आम्ही त्या ठिकाणी या बैठकीत पक्षाचं संघटन, पक्ष आणि पक्षाचे विविध कार्यक्रम यावर प्रदीर्घ चर्चा केली. आम्ही सर्व जण संघटनेमधील कार्यकर्ते आहोत. आम्ही संघटनेमध्ये कार्य केलेलं असल्यामुळे पुढच्या काळातील संघटनेपुढचे आव्हानं आणि राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती याला सामोरे जाण्यासाठी पक्षाचं योगदान अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली, अशी माहिती यावेळी सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language