Hashtagintro

किंग खान घाबरला ? चाहत्यांना मन्नतवर दर्शन दिले खरे, पण जागा बदलली…

किंग खान घाबरला ? चाहत्यांना मन्नतवर दर्शन दिले खरे, पण जागा बदलली…

सुपरस्टार किंग शाहरुख खान याचा आज ६१ वा वाढदिवस साजरा होत आहे. किंग खान याच्या वाढदिवशी त्याने वांद्रे बँण्ड स्टँड येथील त्याच्या मन्नत बंगल्यावर चाहत्यांना दर्शन दिले. मात्र, या दर्शनावेळी अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतरच्या बदलल्या परिस्थितीचे सावट जाणवत होते. दरवर्षी शाहरुख खान मन्नतच्या मुख्य गेटवर येऊन चाहत्यांना भेटत असतो, यावेळी तो मुख्य गेटऐवजी मन्नतच्या मागील बाजूला उभा राहून चाहत्यांना भेटला.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दरवर्षी वाढदिवसाला मन्नतच्या मुख्य गेटवर येऊन चाहत्यांना भेटतो, मात्र यावेळी चाहत्यांना तासन तास वाट पाहायला लावल्यानंतर शाहरुख समोर आला खरा, पण दूरवरूनच त्याने ती त्याची प्रसिद्ध पोझ दाखवली. यावेळी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे शाहरुख याने चाहत्यांपासून थोडे अंतर राखल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेयावरून चाहत्यांमध्ये अशी चर्चा आहे की, टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेमुळे शाहरुख खान घाबरला आहे, तर दुसरीकडे त्याच्या बंगल्यात रिनोव्हेशनचे काम सुरू असल्याने त्याने ठिकाण बदलल्याचेही बोलले जात आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांसमोर येत फिल्मी अंदाजात त्याची ती परिचित दोन्ही हात पसरुन सिग्नेचर पोझ देत चाहत्यांची मनं जिंकली. आज शाहरुख खानचा ६१ वा वाढदिवस असून सकाळपासूनच त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. चाहत्यांना बराच वेळ वाट पाहायला लावल्यानंतर चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुख खान घराबाहेर आला आणि त्याने चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यामुळे त्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या वांद्रे येथील बंगल्यामध्ये सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने, तो तात्पुरता वांद्रे येथीलच वाशू भगनानी यांच्या ‘पूजा कासा’ या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेला आहे. बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे शाहरुख यंदा चाहत्यांना भेटणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र आज आपल्या ६१ व्या वाढदिवसाची परंपरा राखण्यासाठी तो कुटुंबासह ‘मन्नत’वर परतला. त्याने मन्नतच्या गॅलरीतून पांढरा टी-शर्ट, ब्लू डेनिम, काळी टोपी आणि चष्मा अशा साध्या लूकमध्ये चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्याची प्रसिद्ध ‘सिग्नेचर पोझ’ त्याने दिली. तसेच, त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने मन्नत बंगल्याच्या बाहेरील भिंतींवर विशेष मल्टी-पॅनल डिस्प्ले प्रोजेक्ट्स लावण्यात आले होते.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language