Hashtagintro

चारचौघात पाणउतारा, मानखाली घालायचे… पण जागचे हल्ले नाहीत, रंजनासाठी रोज हॉस्पिटलमध्ये बसायचे अशोक सराफ

चारचौघात पाणउतारा, मानखाली घालायचे… पण जागचे हल्ले नाहीत, रंजनासाठी रोज हॉस्पिटलमध्ये बसायचे अशोक सराफ

अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांची पडद्यावरची केमिस्ट्री अप्रतिम होती. दोघांमध्ये बॉन्डिंगही चांगलं होतं. पण जेव्हा रंजना यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. जीवावरचं संकट पायावर आलं होतं. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. या एका अपघाताने त्यांचं करिअर बर्बाद झालं. रंजना नावाचा तारा पुन्हा पडद्यावर दिसला नाही. जेव्हा रंजना यांचा हा भीषण अपघात झाला तेव्हा अशोक सराफ यांनी तिला वाऱ्यावर सोडल्याची अफवा उठली होती. आजही अशोक सराफ यांनी रंजना यांना धोका दिल्याचं म्हटलं जातं. पण ते साफ झूठ आहे. अशोक सराफ हे रंजना यांच्यासाठी रोज हॉस्पिटलला जायचे. पण त्यांना रंजना यांना कधीच भेटू दिलं गेलं नाही.

रंजना देशमुख यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते, तिथेच एका व्यक्तीची काकू उपचार घेत होती. बाजूच्या रुममध्ये त्या मणक्याच्या आजारावर सहा महिने उपचार घेत होत्या. त्यांनी याबाबतची सविस्तर हकीकत सांगितली होती. त्यामुळे अशोक सराफ यांनी रंजना यांना वाऱ्यावर सोडल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं. अशोक सराफ रोज हॉस्पिटलला यायचे. पण त्यांना रंजना यांना भेटू दिलं जायचं ननाही. संध्या बाई (अभिनेत्री संध्या) आणि रंजना यांची आई वत्सला देशमुख तिथेच असायच्या. अशोक सराफ आले की त्या त्यांचा पाणउतारा करायच्या. चारचौघात अपमान करायच्या. अशोक सराफ सर्व निमूटपणे ऐकायचे. कॉरिडोअरमध्ये शांतपणे बसायचे. संपूर्ण अपमान गिळून घ्यायचे. संध्याबाई कॉरिडोअरमध्ये येऊन तमाशा करायच्या. पण अशोक सराफ एक शब्दही बोलायचे नाहीत. खाली मान घालून मुकाट सहन करायचे, असं या महिलेने सांगितलं होतं.

का तुम्ही इतकं ऐकून घेता…

अशोक सराफ कित्येक दिवस येत असायचे आणि रोज त्यांचा अपमान केला जायचा. या महिलेला संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर आणलं जायचं तेव्हा त्या अशोक सराफांशी बोलायच्या. तुम्ही का इतकं ऐकून घेता? असं त्या अशोक मामांना विचारायच्या. पण अशोक सराफ हसून उत्तर देणं टाळायचे. रंजना यांना डिस्चार्ज होईपर्यंत अशोक सराफ रोज यायचे. कॉरिडोअरमध्ये बसून राहायचे. अपमान सहन करायचे. पण त्यांना शेवटपर्यंत भेटू दिलं नाही, असं ही महिला सांगायची.

13 वर्ष व्हिलचेअरवर

रंजना यांना 1987मध्ये मोठा अपघात झाला होता. ‘झुंजार’ सिनेमाच्या शुटिंगवेळी हा अपघात झाला होता. त्यावेळी त्या अवघ्या 32 वर्षाच्या होत्या. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. शरीराचा काही भाग पॅरालाईज्ड झाला होता. हातालाही गंभीर मार लागला होता. अपघातानंतरही त्या अभिनय क्षेत्रात यायला धडपडत होत्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ‘फक्त एकदाच’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं. 13 वर्ष त्या व्हिलचेअरवर होत्या. 3 मार्च 2000 मध्ये त्यांचं निधन झालं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language