Hashtagintro

Amitabh Bachchan : ‘अँग्री यंग मॅन’ आता गुंडांच्या भीतीनं जगतोय, ही एक विडंबनाच…अमिताभ यांच्या बुलेटप्रूफ काचेमागील उपस्थितीवर काँग्रेसनं साधला निशाणा

Amitabh Bachchan : ‘अँग्री यंग मॅन’ आता गुंडांच्या भीतीनं जगतोय, ही एक विडंबनाच…अमिताभ यांच्या बुलेटप्रूफ काचेमागील उपस्थितीवर काँग्रेसनं साधला निशाणा

रविवारी अमिताभ बच्चन बुलेटप्रूफ काचेमागे उभे राहून चाहत्यांना भेटले. जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर जवळपास दोन आठवड्यांनी हे घडलं आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतलेली. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, गुंडांच्या भीतीमुळे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना बुलेटप्रूफ काचेमागे आश्रय घ्यावा लागत आहे.

सचिन सावंत यांची पोस्ट

सचिन सावंत यांनी उपरोधिकपणे, ‘नमो बॉलिवूड जीवन सुरक्षा योजने’ची मागणी केली आणि म्हणाले की, बच्चन यांच्या एका जुन्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्याला 786 क्रमांकाचा बॅच दिला पाहिजे. ते म्हणाले, ‘एकेकाळी ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आता गुंडांच्या भीतीनं जगत आहे, ही एक विडंबनाच आहे. हे चित्र देशाची सद्यस्थिती दर्शवतं का?’

सचिन सावंत यांनी पुढे म्हटलं की, अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी पेट्रोलच्या किंमती आणि घसरणाऱ्या रुपयाबद्दल ट्विट केलं होतं. आता त्यांनी ‘मोदी असतील तर शक्य आहे’ आणि ‘देश सुरक्षित हातात आहे’ असे मेसेज पोस्ट करायला हवेत. भाजपवर निशाणा साधताना, सचिन सावंत यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगची आठवण करून दिली. ‘गब्बरच्या दहशतीपासून तुम्हाला फक्त एकच माणूस वाचवू शकतो, तो म्हणजे स्वतः गब्बर.’ सचिन पुढे म्हणाले, ‘भाजपच्या दहशतीपासून तुम्हाला फक्त एकच पक्ष वाचवू शकतो, तो म्हणजे स्वतः भाजप.’

 

सचिन सावंत शेवटी म्हटलं की, ज्या गुंडाच्या भीतीनं अमिताभ बच्चन यांना बुलेटप्रूफ काचेच्या मागे जावं लागलं, तो गुंड साबरमती तुरुंगात आरामात आहे.

 

दरम्यान, टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर, एका ईमेलमध्ये दुपारी 3:11 वाजता मुंबई महापौरांच्या कार्यालयावर आणि दुपारी 1:11 वाजता एका शाळेवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. त्याच ईमेलमध्ये 31 ऑक्टोबर रोजी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या वांद्रे येथील ‘जलसा’ निवासस्थानावर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली होती. या सर्व धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बिग बींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, या सर्व धमक्या असूनही, बिग बी आपल्या चाहत्यांना भेटत आहेत.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language