Hashtagintro

Supreme Court | ‘तिकीट महाग वाटत असेल तर विमान प्रवास करू नका’; न्यायालयाची टिप्पणी!

नवी दिल्ली : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात विमान तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ होत असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. सामान्य दिवसांच्या तुलनेत विमान भाड्यात ७०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. मात्र, या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. ‘तिकीट महाग वाटत असेल तर विमान प्रवास करू नका’, अशी टिप्पणी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी केली.

न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (२ नोव्हेंबर) हा मुद्दा मांडण्यात आला. विमान प्रवास ही आवश्यक सेवा असून, भाडेवाढ भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला.

दिल्ली-कोलकाता तिकीट ७८ हजारांवर

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-कोलकाता मार्गावरील सामान्य दिवसांत १० ते ११ हजार रुपये असलेले विमान तिकीट ६ नोव्हेंबरच्या प्रवासासाठी ७८ हजार ६९४ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. देशातील प्रमुख मार्गांवर विमान भाडे दोन ते सात पटींनी वाढल्याचा दावाही करण्यात आला. 

एस. लक्ष्मीनारायण यांनी डायनॅमिक प्राइसिंग आणि अतिरिक्त शुल्कांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आता १६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. विमान भाड्यावर मर्यादा निश्चित करणे आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २५ किलोपर्यंत मोफत सामानाची सुविधा देणे, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language