Hashtagintro

Diwali Firecracker Safety Tips: दिवाळीत फटाके फोडताना भाजल्यावर काय कराल! टूथपेस्ट, तेल चुकूनही लावू नका कारण…

Diwali Firecracker Safety Tips: दिवाळीत फटाके फोडताना भाजल्यावर काय कराल! टूथपेस्ट, तेल चुकूनही लावू नका कारण…

Diwali Firecracker Safety Tips: दिवाळीची सुरुवात आता काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे मार्केट देखील विविध वस्तूंनी भरलेली आहेत. तर लहान मुलांची फटाके फोडण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहे. मिठाई, रांगोळी, दिव्यांप्रमाणेच, फटाक्यांचीही या उत्सवात दिसून येत आहे. आता तर पूर्वीपेक्षा अधिक वेगळ्या प्रकारचे फटाके पाहायला मिळतात. त्यामुळे फटाके फोडताना मुलांची काळजी घ्या. आनंदाच्या उत्साहात, फटाके फोडताना झालेला थोडासा निष्काळजीपणाही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे, फटाके फोडताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. भाजल्यानंतर अनेक लोक जी एक चुकीची गोष्ट करतात, ती म्हणजे त्यावर लगेच टूथपेस्ट लावणे. यामुळे जखम आणखी गंभीर होतं.

दिवाळीत पाळायच्या महत्त्वाच्या सुरक्षा खबरदारी आणि योग्य प्रथमोपचार पद्धती जाणून घ्या. भाजलेल्या जागेवर टूथपेस्ट, शाई, खोबरेल तेल, लोणी इत्यादी लावू नका. यामुळे त्वचेतील उष्णता बाहेर पडण्यास अडथळा येऊ शकतो आणि गंभीर संसर्ग होऊ शकतो.

भाजल्यानंतर लगेचच, भाजलेल्या जागेवर 10 ते 15  मिनिटं थंड पाणी, म्हणजेच नळाचं वाहतं पाणी ओता. यामुळे खोलवरच्या उतींची सूज टळेल. थेट बर्फ लावू नका. फटाके फोडताना सैल कपडे, सिंथेटिक/रेशमी कपडे किंवा इतर कोणतीही तयारी करू नका. फक्त जाड सुती कपडे आणि सैल चपला घाला.

भाजलेल्या जागेवर आलेले फोड कधीही फोडू नका. त्याऐवजी, त्यावर स्वच्छ, कोरडी सुती पट्टी सैलसर बांधा. मुले फटाके फोडत असताना प्रौढ व्यक्ती उपस्थित असाव्यात. त्याचप्रमाणे, कोणत्याही परिस्थितीत मुलांना धोकादायक फटाक्यांजवळ जाऊ देऊ नये.

आग लागल्यास, ती विझवण्यासाठी जवळ किमान पाण्याची एक बादली ठेवा. त्याचप्रमाणे, फटाके घरात आणि इतर ठिकाणी सुरक्षितपणे साठवून ठेवावेत. फटाके केवळ मर्यादित प्रमाणातच खरेदी करावेत. घरात असलेले फटाके ढीग करून ठेवलेले असू नयेत. पाळीव प्राणी आणि पक्ष्यांजवळ फटाके फोडू नका. मोठ्या आवाजामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

 

 

 

 

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language