अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अंबानी कुटुंबिय फक्त भारतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबिय टॉपला आहेत.
इतकी श्रीमंती असली तरीही त्यांचा साधेपणा हा सर्वात मोठा खास गुण आहे. अंबानी काहीतरी पंचपकवान खात असतील असा अनेकांचा समज आहे.
पण तसे अजिबातच नाही. अंबानी कुटुंबिय जास्त करून साधे खाण्यावर अधिक भर देतात. अगदी सर्वसामान्य लोकांचे जसे जेवण असते तसेच अंबानींचे दुपारचे जेवण असते.
अंबानी कुटुंबिय दुपारच्या जेवणात डाळ, भाजी, भात, रोटी आणि सॅलड आणि सूप घेतात, बऱ्याचदा त्यांच्या दुपारच्या जेवणात ताकाचाही समावेश असतो.
शक्यतो दुपारचे जेवण सर्वजण एकत्र बसूनच करतात. सर्वसामान्य लोक ज्याप्रमाणे दुपारचे जेवण करतात, तसेच जेवण अंबानी कुटुंबिय देखील करतात. अगदी साधे.
Source: TV9 Marathi National





