Hashtagintro

Sachin Tendulkar: तुम्ही त्याला संधी तर दिलीये पण…वैभवबद्दल सचिन तेंडुलकरांनी व्यक्त केली ‘ती’ खंत

Sachin Tendulkar: तुम्ही त्याला संधी तर दिलीये पण…वैभवबद्दल सचिन तेंडुलकरांनी व्यक्त केली ‘ती’ खंत

Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची नुकतीच दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरने हा निर्णय घाईचा असल्याचे म्हटले आहे. सध्या क्रिकेट विश्वात कदाचित इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा युवा सनसनाटी खेळाडू वैभवचीच जास्त चर्चा होत आहे. प्रचंड प्रतिभा आणि क्षमता असलेला सूर्यवंशी, भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघात स्थान मिळालेल्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. वयाच्या १५ व्या वर्षी, तो आयपीएल हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

सचिन तेंडुलकर वैभवबद्दल काय म्हणाले?

मंगळवारी रेडिटवरील एका प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, सचिन तेंडुलकर यांना विचारण्यात आले, “केवळ १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला कर्णधारपद देण्याबद्दल तुम्हाला काय वाटते?” यावर उत्तर देताना सचिन तेंडुलकर म्हणाला, “मला वाटते की दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला उपकर्णधार बनवणे खूप घाईचे होईल. आपण त्याला अधिक लाल चेंडूचे सामने खेळू दिले पाहिजेत आणि टप्प्याटप्प्याने पुढे जायला हवे. ” सध्या त्याचे आवडते नॉन- भारतीय फलंदाज कोण आहेत?” सचिन यांनी उत्तर दिले, “हॅरी ब्रूक, जो रूट, स्टीव्ह स्मिथ…”

जेव्हा विचारले गेले, “जो रूट तुमच्या कसोटी विक्रमाच्या जवळ पोहोचत आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटते?” तेव्हा तेंडुलकर रूटबद्दल म्हणाले, “मी त्याला नेहमीच खूप उच्च दर्जाचा खेळाडू मानतो, आणि मला त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात जाणवले होते की तो खूप पुढे जाईल.”

सचिनसारखेच उत्तर हे गंभीर यांनीही दिले आहे. पाचव्या टी२० सामन्यापूर्वी प्रसारकांशी बोलताना गंभीर म्हणाला, “सर्वात आधी, प्रत्येकाला खूश करणे हे माझे काम नाही. माझे काम योग्य निर्णय घेणे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नाही. आणि त्यासाठीच मी इथे आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना ड्रेसिंग रूममधील वातावरण सुरक्षित राहिल. जे खेळाडू दिर्घकाळापासून संघात आहे, त्यांना आधी प्राधान्य दिलं जाईल, वैभवकडे अजून खूप वेळ आहे.”

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language