Hashtagintro

Adinath Kothare : रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवून….आदिनाथने सांगितला ‘रामायण’ सिनेमात काम करण्याचा अनुभव

Adinath Kothare : रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवून….आदिनाथने सांगितला ‘रामायण’ सिनेमात काम करण्याचा अनुभव

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या रामायण या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान श्रीरामांच्या धाकट्या भाऊ भरत याची भूमिका साकारत आहे. मात्र आदिनाथला ही भूमिका सहज मिळालेली नाही. एका चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली नाही. पण त्याच ऑडिशनमुळे त्याच्यासाठी रामायणाचे दरवाजे खुलले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने ही गोष्ट सांगितली आहे.

आदिनाथने सांगितले की, त्याने यापूर्वी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या निर्मितीतील ‘तारला’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. या चित्रपटासाठी त्याची निवड अंतिम टप्प्यापर्यंत झाली होती. मात्र त्याला मुख्य भूमिका मिळाली नाही. तरीही या ऑडिशनमधून निते तिवारी यांच्यापर्यंत त्याच काम पोहोचलं. त्यानंतर ‘रामायण’ साठी त्याने ऑडिशन दिले. त्याचं काम आणि अभिनयाची क्षमता लक्षात घेऊन नितेश तिवारी यांनी त्याला
भरताच्या भूमिकेसाठी निवडलं.

आदिनाथने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक खास अनुभवही सांगितला. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्याला या चित्रपटाची भव्यता लक्षात आली. अयोध्येतील एका प्रसंगाचं चित्रिकरण सुरू होतं. त्यावेळी रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि अरूण गोविल यांच्यासह संपूर्ण कलाकरा मंडळी सेटवर उपस्थित होती. तो प्रसंग पूर्ण झाल्यानंतर आपण किती मोठ्या प्रकल्पाचा भाग आहोत, याची जाणीव झाल्याचं त्याने सांगितलं.

या चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूरनेही आदिनाथला मदत केली, असे आदिनाथने सांगितले. एका प्रसंगाच्या शूटिंगवेळी आदिनाथला एक वेगळ्या प्रकारे सीन शूट करण्याची कल्पना सूचली. मात्र दिग्दर्शकाच्या सूचना पाळाव्या की स्वत:ची कल्पना मांडावी, याबाबत तो थोडा गोंधळलेला होता. त्यावेळी रणबीरने खांद्यावर हात ठेवून त्याला त्याची कल्पना मांडण्यास सांगितले, तसा तो सीन शूटही केला. नितेश तिवारींना देखील आदिनाथची ती कल्पना आवडली. या प्रसंगमामुळे सेटवरचा संकोच दूर झाला आणि तो अधिक मोकळेपणाने काम करू लागला. असे आदिनाथने सांगितले.

आदिनाथने ‘रामायण ‘ च्या सेटवरील शिस्तीचंही विशेष कौतुक केलं. सेटवर मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नव्हती. चित्रीकरण सुरू नसतानाही प्रत्येक जण शिस्त पाळत असे. त्यामुळे हा सेट एखाद्या मंदिरासारखा पवित्र वाटायचा.असं त्याने सांगितलं. दिग्दर्शक नितेश तिवारी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतं होते असेही आदिनाथने सांगितले.

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आदिनाथ कोठारे भरातची भूमिका साकारत असून, हा त्याच्या कारकिर्दितील महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language