Hashtagintro

अमेरिकेच्या निवडणुकीत किती भारतीय जिंकले? अमिश शाह यांच्यासह इतरांचा निकाल काय?

अमेरिकेच्या निवडणुकीत किती भारतीय जिंकले? अमिश शाह यांच्यासह इतरांचा निकाल काय?

अमेरिकेच्या मिडटर्म इलेक्शनमध्ये भारतीय वंशाचे नागरिकही उतरले आहेत. या सर्वांचा निकाल लवकरच येणार आहे. फ्लोरिडामधून डेमोक्रॅटिक उमेदवार पिया डंडिया यांचा विजय झाला आहे. त्या भारतीय वंशाच्या आहेत. ओहियोच्या गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढवणारे विवेक रामास्वामी हे पिछाडीवर आहेत. तर अमिश शाह, नित्या रमन आणि सरिता कोमारेड्डी यांचा निकाल अजून आलेला नाहीये. त्यामुळे हे भारतीय वंशाचे उमेदवार जिंकतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी मिडटर्म निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत मिळतंय की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल समोर आला आहेत. भारतीय वंशाच्या उमेदवारांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. फ्लोरिडातून पिया डंडिया या विजयी झाल्या आहेत. इतर उमेदवारांच्या जागांवर मतमोजणी सुरू आहे.

पिया डंडिया यांचा विजय

भारतीय वंशाच्या पिया डंडिया या फ्लोरिडामधून डेमोक्रॅटिक पक्षाकडून उब्या होत्या. त्यांनी फ्लोरिडाच्या 22 व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून विजय मिळवला आहे. डिसिजन डेस्क HQ ने त्यांना विजयी घोषित केलं आहे. सुमारे 94 टक्के मतांच्या मोजणीवेळी पिया डंडिया यांना सुमारे 52.2 टक्के मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रिपब्लिकनचे केसी अस्कर यांना केवळ 47.8 टक्के मते मिळाली आहेत. अशा पद्धतीने पिया यांनी मोठा विजय मिळवला आहे.

ही जागा रेडिस्ट्रिक्टिंग नंतर ओपन झाली होती. म्हणजे कोणताही विद्यमान खासदार आपली सीट वाचवण्यासाठी मैदानात नव्हता. पिया या डेमोक्रॅटिकच्या उमेदवार आहेत. तसेच त्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत.

विवेक रामास्वामी ओहियो पिछाडीवर

या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक विवेक रामास्वामी ओहियो हे गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत मैदानात आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये डेमोक्रॅटिकचे प्रतिस्पर्धी उमेदवार एमी एक्टनने त्यांना धोबी पछाड केल्याचं दिसत आहे. सुमारे 28 ते 29 टक्के मतांच्या मोजणीवेळी एमी एक्टन यांना 61 ते 62 टक्के मते मिळाली. तर भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांना सुमारे 35 ते 36 टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान मतमोजणी अजून सुरू आहे. निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे निकालात उलट फेर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अमिश शाहांचं काय होणार?

या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमिश शाह एरिजोनाच्या पहिल्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हसची निवडणूक लढवत आहेत. त्यांची थेट टक्कर रिपब्लिकन उमेदवार जे फिली यांच्याशी आहे. या दोघांमध्ये चुरशीची लढत असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणूक सर्व्हेमध्ये अमिश शाह यांना किंचित आघाडी मिळाली होती. त्यामुळे प्रत्यक्षात निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language