Hashtagintro

Goa Rent a Car Bike | भाड्याच्या कार-बाईक ग्राहकांसाठी आता डिजिटल नोंदणी

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात पर्यटन हंगामाला वेग येण्यापूर्वी भाड्याने कार आणि दुचाकी देणाऱ्या व्यवसायिकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व पर्यटकांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी गोवा पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. भाड्याने वाहन घेणाऱ्या ग्राहकांची माहिती पारंपरिक हस्तलिखित नोंदवहीऐवजी रिअल-टाइम डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी ‘गोवा पोलिस अॅप’चा वापर करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी मांडला आहे.

पणजीपोलिस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार यांनी भाड्याने कार आणि दुचाकी देणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत व्यापक समन्वय बैठक घेतली. या बैठकीत वाहन भाडे व्यवसायातील नियामक नियमांचे पालन, सुरक्षा उपाययोजना आणि व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत वाहन भाडे व्यवसायिकांनी पांढऱ्या नंबर प्लेटच्या खासगी वाहनांचा वापर करून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर भाडे व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पर्यटक गोव्यातून परतल्यानंतर त्यांच्या नावांवर झालेली वाहतूक नियमभंगाची चलने व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचाही उल्लेख करण्यात आला. या मुद्यांची सरकार आणि वाहतूक खात्याकडून तपासणी सुरू असल्याचे डीजीपींनी स्पष्ट केले.

बेकायदेशीर वाहन भाडे व्यवसायाला आळा घालण्यासाठी आवश्यक अधिसूचना जारी करणे तसेच वाहतूक चलन भरण्याशी संबंधित कायदेशीर तरतुदी अधिक सुसूत्र करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालवण्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच अलीकडेच अवैध स्पा व्यवसायाविरोधातील केलेल्या कारवाईचाही आढावा घेतला.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाऊल

दरम्यान, गुन्हेगारी कृत्यांसाठी भाड्याच्या वाहनांचा वापर होऊ नये, यासाठी ग्राहकांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले. त्यासाठी ‘गोवा पोलिस अॅप’च्या माध्यमातून वाहन भाड्याने घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची माहिती तत्काळ नोंदवण्याचा प्रस्ताव आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language