मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे अमृता ही चर्चेत असते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमृताने तीन गुन्हा कबूल केले आहेत. आता हे तीन गुन्हे कोणते ते वाचा…
अमृता खानविलकरने अभिनेता प्रसाद ओक यांचा मुलगा मयांक ओकच्या Kind of काहीतरी या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केले आहे.
अमृता खानविलकरने पाटीवर लिहून गुन्हे कबूल केले आहेत. 'मला असं वाटतं की, हे तीन गुन्हे मी केलेले आहेत. प्रेमात पडणं हा माझा पहिला गुन्हा आहे. गोड खाणे हा माझा दुसरा गुन्हा आहे. मी खूप गोड पदार्थ खाते. आणि तिसरा म्हणजे आळस' असे अमृता म्हणाली आहे.
पुढे ती म्हणाली, पहिल्या गुन्ह्याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, 'आता हा गुन्हा परत करायला नको. प्रेमात पडल्यानंतर ते जे पडून राहणं असतं, ते मला आता नको.'
दुसऱ्या आणि तिसऱ्या गुन्ह्याविषयी बोलताना अमृता म्हणाली की, 'गोड खाणं सुटत नाही आणि आळस आता मला आला आहे.'
Source: TV9 Marathi Entertainment





