Hashtagintro

Nashik : प्रेशर गनमधून फायर होऊन पाेटात खिळा शिरला अन् अनर्थ घडला, लिकर शॉपमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Nashik : नाशिकच्या सिडको परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको परिसरात असलेल्या स्टेट बँक चौकाजवळ असलेल्या लिकर कट्टा दुकानात एक दुर्देवी घटना घडली आहे. दुकानात काम करत असताना प्लायवुडचे खिळे ठोकण्याच्या प्रेशर गनमधून (नॅमॅटिक गन) अचानक फायर होऊन सुटलेला खिळा थेट लिकर सेल्समनच्या पोटात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्तस्राव अधिक झाल्याने उपचारादरम्यान या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनील अनिल तायडे (वय ३९, रा. सी-१२, इन्कमटॅक्स कॉलनी, अंबड लिंक रोड, नाशिक) असे मृत कामगाराचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनील तायडे हे सिडको येथील स्टेट बँक चौकाजवळ असलेल्या लिकर कट्टा दुकानाच्या काउंटरवर बसले होते. यादरम्यान दुकानात किंवा आजूबाजूला प्लायवुडचे (लाकडाचे) काम सुरू असताना अचानक खिळे ठोकण्याच्या प्रेशर गनमधून फायर झाले. मशिनमधून सुटलेला खिळा हा थेट सुनील तायडे यांच्या पोटात आरपार शिरला. यामुळे त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात
रक्तस्राव झाला.
https://www.prahaar.in/2026/11/05/nashik-licenses-of-five-sweet-manufacturers-in-nashik-suspended-unhygienic-conditions-and-cockroach-infestation-uncovered/
​घटना घडल्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाली तायडे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील (Nashik) खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री तायडे यांना तपासून डॉ. विशाल करवंदे यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाेलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या सूचनेने तपास सुरु आहे.

तपासात एफएसएलची मदत
​दरम्यान, ही घटना केवळ एक अपघात आहे, तांत्रिक बिघाड आहे की मानवी चुकांचा काही संशयास्पद भाग आहे, यादृष्टीने पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. यात फायर कसा झाला आणि बटन कोणी प्रेस केले? गनचे ट्रिगर किंवा सेफ्टी लॉक अनावधानाने दाबले गेले की मशिनमध्ये तांत्रिक बिघाड होता, याचा शोध घेतला जात आहे. घटनेमागील नेमके सत्य समोर आणण्यासाठी फॉरेंसिक सायन्स (तज्ज्ञ) आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून सखोल तपास केला जात आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language