Hashtagintro

दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणावर NMMCचा वॉच! नवी मुंबईतील 8 विभागांसाठी हेल्पलाइन जाहीर

नवी मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने (NMMC) कडक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना प्रदूषणासंदर्भातील तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी महापालिकेने 8 विभागनिहाय हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी उपलब्ध करून दिले आहेत. यासोबतच 2 टोल-फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी Suo Motu PIL No. 01 of 2026 मध्ये दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही व्यवस्था केली आहे. ध्वनी आणि पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातील तक्रारी स्वीकारण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस विभागांना स्वतंत्र संपर्क व्यवस्था उभारण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
महापालिकेच्या आवाहनानुसार, फटाके फोडण्यासाठी रात्री 7 ते 10 या वेळेची मर्यादा पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या 5 ऑक्टोबर 1999 च्या अधिसूचनेनुसार 125 डेसिबल (AI) पेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे. बेरियम क्षार, लिथियम, आर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखे घातक घटक असलेल्या फटाक्यांवरही न्यायालयीन निर्देशांनुसार प्रतिबंध आहे. फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी Explosives Act, 1884 आणि Explosives Rules, 2008 मधील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करता येणार नाही. परवानगी असलेले फटाके महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी आणि आवश्यक परवानग्या घेऊनच विकता येणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/05/a-special-package-of-rs-160-crore-for-primitive-tribes-and-the-pardhi-community/
दिवाळीत AQI 91 वरून 212 पर्यंत; आरोग्याला धोका
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. सामान्य काळात नवी मुंबईचा सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुमारे 91 असतो; मात्र दिवाळीदरम्यान तो सुमारे 212 पर्यंत वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. हवेत वाढणाऱ्या विषारी प्रदूषकांमुळे श्वसनविकारांसह आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळा-महाविद्यालयांनाही जनजागृतीचे निर्देश
फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत. नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली असून, महापालिकेच्या विभागीय सहाय्यक आयुक्तांनाही नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
‘माझी वसुंधरा अभियान’, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2026’ आणि ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण’ या उपक्रमांच्या अनुषंगाने महापालिकेने नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मातीचे दिवे वापरणे, कागदी किंवा कापडी कंदील लावणे, प्लास्टिक सजावट आणि पिशव्या टाळणे, फटाके न फोडणे तसेच झाडांवर विद्युत सजावट न करण्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबईतील विभागनिहाय तक्रार हेल्पलाइन

विभाग
हेल्पलाइन क्रमांक

बेलापूर
8976954881

नेरुळ
8976954882

तुर्भे
8976954883

वाशी
8976954884

कोपरखैरणे
8976954885

घणसोली
8976954886

ऐरोली
8976954887

दिघा
8976954889

टोल-फ्री क्रमांक : 1800222309 / 1800222310
ध्वनी आणि वायुप्रदूषणासंदर्भातील तक्रारी नागरिकांनी संबंधित विभागाच्या हेल्पलाइनवर किंवा महापालिकेने उपलब्ध केलेल्या ई-मेल आयडीवर नोंदवाव्यात, असे आवाहन NMMCने केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language