Hashtagintro

India vs New Zealand live streaming: भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. या विजयासह पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे साना 7 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर भारताचा वरचष्मा असेल, पण न्यूझीलंडचं होमग्राउंड असल्याने दबाव असणार आहे. त्यात न्यूझीलंडने पहिला वनडे सामना गमावला असल्याने जोरकसपणे परतण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 185 धावांवर रोखलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे षटकं आणि धावा कमी करण्यात आल्या आणि भारतासमोर 143 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने पाच गडी गमवून सहज पूर्ण केलं. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाणार आहे?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना 7 नोव्हेंबर (शनिवारी) खेळला जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना वेलिंग्टन येथील हेन्री स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी होईल.

https://www.prahaar.in/2026/11/06/nd-vs-nz-2nd-odi-virat-kohli-has-sachin-and-ponting-records-in-his-sights-in-wellington-find-out-what-they-are/
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण SonyLIV ॲपवर उपलब्ध असेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी/मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग

न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, जेकब डफी/मॅट हेन्री, ब्लेअर टिकनर.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language