महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नम्रता संभेराव, समीर चौघुले, प्रसाद खांडकेर, वनिता खरात, ओंकार भोजने, पृथ्वीक प्रताप सारख्या कलाकारांचीही या शोमुळे लोकप्रियात प्रचंड वाढली आहे.
अनेक कलाकारांनी या हा शो सोडलाही आहे, तर काही लोक परतही आले आहेत, काही नवीन चेहऱ्यांना संधीही दिली जात आहे, आता यातच दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी यावर आपले मत मांडले आहे.
ते म्हणाले की, विशाखा असो, गौरव, अंशुमन की ओंकार, आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने काम थांबवले तर वाईट हे प्रत्येकाच्याच जाण्याने वाटते. मी नेहमी म्हणतो नो वन इज रिप्लेसेबल अँड एव्हरीवन इज रिप्लेसेबल'. जर कामाची आखणी सुरु असतानाच कल्पना दिली तर त्यांच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
'एकदा एका कलाकाराचा बाज तयार झाला की तो त्या पात्राच घट्ट बसतो, त्याची जागा दुसरा कोणीच घेऊ शकत नाही. प्रत्येक कलाकाराची मंचावरील जागा ही ठरलेली असते आणि ती तितकीच महत्त्वाचीही असते.” असं ते म्हणाले.
संत तुकडोजी महाराजांची 'या झोपडीत माझ्या' ही कविता मला आवडते कारण, आमचे प्रॉडक्शनही तसेच आहे, आम्ही कधीच कोणाला शो सोडून जा म्हणून सांगितलं नाही, कोणावर जबरदस्तीने या म्हणूनही दबाव टाकला नाही. “असं ते म्हणाले.
Source: TV9 Marathi Entertainment





